
Sidharth Kiara Wedding: वरुण धवनपासून ते कतरिनापर्यंत, या सेलिब्रिटींनी सिड-कियाराला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा
बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मंगळवारी म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड आणि कियाराने लग्न केलं आहे .
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटीही सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाबद्दल बी-टाऊनचे सेलिब्रिटीही अभिनंदन करत आहेत. करण जोहर, मनीष मल्होत्रा ते भेडिया अभिनेता वरुण धवन यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच वरुण धवनने लिहिले आहे की, "विशिंग यू ए लाइफ टाइम ऑफ लव्ह."

Varun Dhawan
करण जोहरने देखील कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याचवेळी करणने इंस्टाग्रामवर या जोडप्यासाठी एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला आहे.
डिझायनर मनीष मल्होत्राने देखील कियारा आणि सिद्धार्थ यांना त्यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, "सुंदर जोडी मिसेस आणि मिस्टर मल्होत्रा यांना खूप प्रेम आणि आशीर्वाद."
कतरिना कैफ, विकी कौशल, आयुष्मान खुराना यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, या सर्व चित्रपटातील व्यक्तिमत्त्वांनी सिड-कियाराला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Kaif

Vicky Kaushal
गेल्या दोन दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी त्यांच्या लग्नासाठी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये उपस्थित होते. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाआधीचे फंक्शन 5 फेब्रुवारीपासून सुरू झाले आणि 7 फेब्रुवारीला त्यांचे लग्न झाले.
या जोडप्याने जैसलमेरमध्ये लग्नाचे सात फेरे घेऊन डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिड आणि कियारा शेरशाह चित्रपटानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि आता त्यांनी त्यांच्या नात्याला लग्नाचे नाव दिले आहे.