
Sidharth Malhotra: 'प्रेस कॉन्फरन्स थोडी सुरू आहे‘, नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकल्यानंतर सिद्धार्थची अजब प्रतिक्रिया
या वर्षी देशाने दोन ऑस्कर जिंकले आहेत ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटु-नाटु' या गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे, तर 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
बॉलीवूड कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळेच याबद्दल अभिनंदन करत आहेत, मात्र अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला जेव्हा ऑस्करमधील विजयावर प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा वेगळंच घडलं. मुंबई विमानतळावर पापाराझींनी सिद्धार्थचा हा व्हिडीओ शूट केला. मात्र ऑस्करच्या विजयाबद्दल तो अशी प्रतिक्रिया देईल, याची कोणीच अपेक्षा केली नसेल.
सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एअरपोर्टच्या दिशेने चालताना दिसत आहे. पापाराझी जेव्हा त्याला ऑस्करमधील भारताच्या विजयावर प्रतिक्रिया विचारतात, तेव्हा तो म्हणातो, “इथे पत्रकार परिषद सुरू आहे का?” त्याची ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता चाहत्यांना सिद्धार्थची ही प्रतिक्रिया पचनी पडली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ट्रोलच्या निशाण्यावर आला आहे. चाहते अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे - चित्रपट चालत नाही, म्हणूनच असे अॅटिट्यूड दाखवत आहे. ‘तो घाईत असला तरी दोन शब्द चांगलेसुद्धा बोलू शकला असता.
मात्र अशी प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नव्हती’, असे एकाने लिहिले. तर काहींनी बॉलिवूड विरुद्ध साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला. बॉलिवूड कलाकार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या विजयावर जळतात, असंही एका युजरने म्हटले आहे.
95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने दोन ऑस्कर जिंकले आहेत. ज्यामध्ये एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' गाण्यातील नाटु-नाटुने ऑस्कर जिंकून इतिहास रचला आहे. आरआरआरच्या नाटु-नाटु या गाण्याला जेव्हा ऑस्कर दिला जात होता, तेव्हा संपूर्ण देश आणि जग आनंदाने नाटु-नाटु वर नाचत होते.