
Sidharth Malhotra: एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थने आलियाला वाढदिवसाच्या अशा प्रकारे दिल्या शुभेच्छा, तर कियारा म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काल म्हणजेच १५ मार्च रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांसोबतच चित्रपट कलाकारांनीही आलियाला खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा आणि त्याची पत्नी कियारा अडवाणी यांचाही समावेश होता.
सिद्धार्थ मल्होत्राने 'कपूर अँड सन्स' चित्रपटातील 'कर गई चुल' गाण्याचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आलियासोबत डान्स करताना दिसत आहे. या फोटोसोबत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आलिया. हे वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्तम जावो. खूप सारं प्रेम."
आलिया आणि सिद्धार्थने 2012 साली स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ब्रेकअपनंतरही दोघे खूप चांगले मित्र आहेत. एका मुलाखतीत आलियाने स्वतः सांगितले होते की तिच्या आणि सिद्धार्थमध्ये काहीही वाईट घडले नाही.
अभिनेत्री कियारा अडवाणीनेही आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कियाराने इंस्टाग्राम स्टोरीवर आलियाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "हॅप्पी बर्थडे आलिया.. कीप शायनींग."

sidharth malhotra
या वर्षी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी एकमेकांशी लग्न केले आहे. याशिवाय गेल्या वर्षी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आलिया आणि रणबीरला राहा नावाची मुलगीही आहे.

kiara advani
आलिया भट्ट सध्या लंडनमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या हार्ट ऑफ स्टोन या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. रणबीर कपूर, मुलगी राहा, आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन हे देखील त्याच्यासोबत लंडनला गेले आहेत. यापूर्वी आलियाचा एक फोटोही समोर आला होता, ज्यामध्ये ती एक मोठा केक कापताना दिसली होती. केकवर 30 लिहिले होते.