'सिडनाज'चे चाहते असाल तर 'ही' आहे तुमच्यासाठी ट्रीट,पहा भूला दुंगा हे गाणं..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शेहनाज गिल यांची 'बिग बॉस १३' मधील केमिस्ट्री पाहून चाहते या जोडीच्या प्रेमात पडले होते.. सिडनाजची केमिस्ट्री पाहायची असेल तर 'भूला दुंगा' हे त्यांचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे..

मुंबई- अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शेहनाज गिल यांची 'बिग बॉस १३' मधील केमिस्ट्री पाहून चाहते या जोडीच्या प्रेमात पडले होते..त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाचा 'सिडनाज' हा हॅशटॅग देखील ट्रेंड केला होता..मात्र 'बिग बॉस १३' नंतर हे दोघं कधी एकत्र पाहायला मिळणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना होती...आणि आता या चाहत्यांसाठी खुषखबर आहे..सिडनाजची केमिस्ट्री पाहायची असेल तर 'भूला
दुंगा' हे त्यांचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे..

coronavirus: कामगारांच्या मदतीसाठी धावून आले रजनीकांत..केली एवढी मोठी रक्कम दान 

या गाण्याच्या व्हिडिओत दोघांची मस्ती आणि रोमँटीक अंदाज पाहायला मिळत आहे..व्हिज्युअल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे गाणं एका वेगळ्या अंदाजात शूट केलं गेलं आहे..हा व्हिडिओ पुनित पाठकने दिग्दर्शित केला आहे..हे गाणं एक सॅड साँग आहे ज्यात प्रेमात तुटलेली दोन्ही मनं एकमेकांना विसरायचा प्रयत्न करत असतात...या गाण्याचे बोल मनाला भिडणारे आहेत...प्रेमभंग झालेल्यांसाठी या गाण्याचे बोल लिहिले गेले आहेत..गुरप्रीत सैनी आणि गौतम शर्मा यांनी गाण्याच्या ओळी लिहील्या आहेत..दर्शन रावलने हे गाणं गायलं असून त्यानेच या गाण्याला संगीत देखील दिलं आहे..

'सिडनाज' नावाने प्रसिद्ध झालेल्या या जोडीच्या या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते..हे गाणं रिलीज झाल्यानंतर काही क्षणातंच व्हायरल होऊ लागलं आहे..रिलीजच्या २ तासांनंतर या गाण्याला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.इतकंच नाही तर हा व्हिडिओ सध्या नंबर एक वर ट्रेंड करतोय..

Image result for sidnaz

'बिग बॉस १३' मध्ये सिद्धार्थ आणि शेहनाजच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं..शो मध्ये अनेकवेळा सिद्धार्थने शेहनाजला बाहेर गेल्यावर भेटणार नसल्याचं म्हटलं होतं...त्यामुळे या दोघांचे चाहते नाराज होते मात्र हा शो संपल्यानंतर लगेचच शेहनाजचा नवीन शो 'मुझसे शादी करोगे' मध्ये काही एपिसोडसाठी दोघे एकत्र दिसले होते...'सिडनाज'च्या चाहत्यांना बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघांची
केमिस्ट्री कशी असेल याची उत्सुकता होती..

Image result for paras mahira asim himanshi siddharth shehnaz songs

सिद्धार्थ आणि शेहनाज बिग बॉसची पहिली जोडी नाहीये ज्यांनी एकत्र गाणं केलं आहे..शो संपल्यानंतर आसिम रियाज-हिमांशी खुराना ही जोडी नेहा कक्करने गायलेल्या 'तु कल्ला ही सोणा नही' या गाण्यात एकत्र दिसली होती तर माहिरा आणि पारस हे दोघंही 'बारिश' या गाण्यात एकत्र दिसले होते..

sidharth shukla and shenaaz gills song bhula dunga has released


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sidharth shukla and shenaaz gills song bhula dunga has released