Amruta Fadnavis: गाण्याचा जरा सराव कर आणि... अमृता फडणवीस यांना आशा भोसलेंचा मोलाचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amruta fadnavis, asha bhosle

Amruta Fadnavis: गाण्याचा जरा सराव कर आणि... अमृता फडणवीस यांना आशा भोसलेंचा मोलाचा सल्ला

Amruta Fadnavis on Asha Bhosle News: नुकतंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांची भेट घेतली. या भेटीविषयी अमृता यांनी सोशल मिडीयावर भावना व्यक्त केल्यायत..

(singer Asha Bhosle's Valuable Advice To Amruta Fadnavis that Practice Singing)

या भेटीविषयी अमृता लिहितात.. श्रीमती आशा भोसले यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले!

आशा भोसलेंशी म्युझिक आणि इतर संगीताबद्दल छान संवाद साधला. आशा ताईंनी मला गाण्याची प्रॅक्टिस करायला सांगितलं. याशिवाय व्हॉईस मॉड्युलेशनबाबत खूप मार्गदर्शन केले. आता आमच्या पुढील संगीत भेटीसाठी आम्ही उत्सुक आहोत.

आशा भोसले आणि अमृता फडणवीस यांची ही भेट खास ठरली. अमृता यांनी आशा भोसले यांच्याशी मनमुराद संवाद साधला. याशिवाय आशा भोसलें सोबत खास फोटो काढला. दोघींनी अनेक विषयांवर खास चर्चा केली. अशीही चर्चा आहे की अमृता फडणवीस आणि आशा भोसले यांचं एकत्रित गाणं येणार अशी चर्चा आहे.

काहीच दिवसांपुर्वी आशाताई भोसले यांना मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सुधीर मुनगंटीवार, सुरेश वाडकर, जॅकी श्रॉफ, उदित नारायण उपस्थित होते.

आशा भोसले पुरस्काराला उत्तर देताना म्हणाल्या, मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यासारखे वाटते आहे. महाराष्ट्रात आल्यावर वेगळीच भावना असते.

दहा वर्षांची असताना माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. मी यापुढेही गात राहणार. मला असे वाटते की, महाराष्ट्रभूषण मिळाला तो मला भारतरत्नासारखा आहे. माझ्या घरातून मिळालेला पुरस्कार आहे. मी ९० वर्षांपर्यत थांबले आहे.