'थोडी शिस्त ठेवा जास्त शहाणपणा करताय...', चालू कार्यक्रमात कैलाश खेर संतापले! स्टेजवरच झापलं...Kailash Kher Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

singer kailash kher angry video viral at khelo india University games in lucknow video viral

Kailash Kher: 'थोडी शिस्त ठेवा जास्त शहाणपणा करताय...', चालू कार्यक्रमात कैलाश खेर संतापले! स्टेजवरच झापलं...Video Viral

Kailash Kher Video Viral: सुफी संगीतातील एक अजरामर आणि तितकचं लोकप्रिय नाव म्हणजे प्रसिद्ध गायक कैलाश खेर. केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर त्यांना जगभरात त्याचे चाहते पसरले आहे. त्यांचा आवाज श्रोत्यांच्या काळजात ठसणारा आहे. त्यांना नुकतच लखनौ येथे 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023' मध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . मात्र खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या उद्घाटन समारंभात मोठा वाद निर्माण झाला होता. बॉलीवूडचा स्टार गायक कैलाश खेर यांनी लखनौमधील बीबीडी येथे कार्यक्रमादरम्यान आयोजकांना फटकारलं. त्यांनी या कार्यक्रमाबाबत वाईट अनुभव आल्यामुळे त्यांनी आयोजकांवर ताशेरे ओढले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(singer kailash kher angry video viral at khelo india University games in lucknow video viral)

कैलाश खेर म्हणाले की, 'तुम्ही हुशारी दाखवता, जरा सभ्यता शिका, आम्हाला एक तास थांबवलं, हे खेलो इंडिया काय आहे? असं काम होतं तर आलोच नसतो.'

ते म्हणाले की खेलो इंडिया तेव्हाच आहे जेव्हा आपण आनंदी असतो, जेव्हा जेव्हा घरातील सदस्य आनंदी असतील तरच बाहेरचे लोकही आनंदी असतील. भडकलेल्या कैलाश खेर यांना पाहून तेथील सगळेच थक्क झाले.

ते म्हणाले, "तुम्ही मला परफॉर्मन्ससाठी बोलावलं असेल, तर पुढचा एक तास पूर्णपणे माझा आहे. मी माझी मातृभूमी भारत आणि तेथील नागरिकांची पूजा करतो. पण व्यवस्थापन योग्य असलं पाहिजे, अन्यथा कार्यक्रम विस्कळीत होत जाईल."

कैलाश खेर यांनी आपला राग बाजूला सारला आणि नंतर कार्यक्रमाच्या मंचावर पोहोचले. त्यांनी अनेक गाणी गायली.

यावेळी यूपीचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी डान्स केला. यावर कैलाश खेर यांनीही ट्विट केले आणि लिहिले, 'खेळ आणि संगीत यांना एकत्र जोडण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमचे आभार, देशात युगानुयुगे दोन्ही शैली हलक्यात घेतल्या जात आहेत.'