बर्थडे स्पेशल : गायक मिका सिंगचा 'तो' वाढदिवस आजही चर्चेत...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 June 2020

ब्बल पंधरा वर्षापूर्वी आपल्याच बर्थ डे पार्टीत मिका सिंगने आयटम गर्ल राखी सावंतला भर पार्टीत किस केला होता आणि त्यानंतर मोठे वादळ निर्माण झाले होते.

मुंबई ः ढिंका चिका, दिल में बजी गिटार, बन गया कुत्ता यांसारखी एकापेक्षा एक गाणी गाणारा मिका सिंग याचा आज वाढदिवस. नेहमीच विवादामध्ये अडकलेल्या मिका सिंगची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तब्बल पंधरा वर्षापूर्वी आपल्याच बर्थ डे पार्टीत मिका सिंगने आयटम गर्ल राखी सावंतला भर पार्टीत किस केला होता आणि त्यानंतर मोठे वादळ निर्माण झाले होते. ती पार्टी आणि तो किस्सा मिकाचे चाहते आजही विसरलेले नाहीत.

वाचा ः कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने वुहानला मागे सोडले, तर महाराष्ट्र चीनच्याही पुढे

मिका सिंगचे खरे नाव आहे अमरीक सिंग. मात्र बॉलिवूडमध्ये मिका सिंग या नावाने तो प्रसिद्ध आहे. मिका प्रसिद्ध गायक दलेर मेंहदीचा धाकटा भाऊ आहे. आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मिकाने इंडस्ट्रीत गायक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मिका सिंग आपल्या भावाच्या बँडमध्ये गिटारिस्ट म्हणून काम सुरु केले होते. मिका सिंगने दलेर यांच्यासाठी 'डर दी रब रब कर दी' हे गाणे कंपोझ केले होते. त्यानंतर त्याने स्वतः पार्श्वगायन करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा मिका रेकॉर्डिंग स्टुडिओत जायचा तेव्हा दलेर मेंहदीच्या नावावर संगीतकार, दिग्दर्शक त्याचे गाणे ऐकायला तयार व्हायचे. मात्र दुसऱ्याच क्षणी त्याचा अन-कन्वेंशनल आवाज ऐकून त्याला रिजेक्ट करायचे. मिकाला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. प्रत्येक ठिकाणी निराश पदरी पडल्यातर मिकाने स्वतःचा अल्बम काढण्याचा निर्णय घेतला. अल्बममधील 'सावन में लग गई आग' हे गाणे खूप गाजले.

वाचा ः लातूरसारखं कोकणात किल्लारी पॅटर्न अशक्य? पवारांनी दिलं 'हे' उत्तर

त्यानंतर मिकाने आपल्या याच अन-कन्वेंशनल आवाजाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मिका सिंगने 'वीरे दी वेंडिंग', 'पॅडमेन', 'सीक्रेट सुपरस्टार', 'रईस', 'सुल्तान', 'बजरंगी भाईजान', 'एबीसीडी 2', 'ग्रॅण्ड मस्ती' अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. मिकाने हिंदी बरोबर पंजाबी, मराठी, बंगाली, तेलुगू व कन्नड भाषेत गाणी गायली आहेत. मिकाचे 'गबरू', 'दुनाली', 'इश्क ब्रांडी' असे अनेक अल्बम गाजले आहेत. २००६ मध्ये आयटम गर्ल राखी सावंतला मिकाने आपल्याच बर्थ डे पार्टीत सर्वांसमोर किस केले होते. त्याच्या या लिपलॉकमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. या कारणामुळे राखी न्यायालयातसुद्धा गेली होती. अनेक दिवस हे प्रकरण मीडियात गाजले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer Mika Singh birthday special story