ब्रेकअपनंतरही नेहा कक्कडला मिळाले 'व्हॅलेंटाईन डे' गिफ्ट

Singer Neha Kakkar Shares a Video on Instagram of Valentines Day Surprise Fan Express Love
Singer Neha Kakkar Shares a Video on Instagram of Valentines Day Surprise Fan Express Love

गेल्या काही दिवसांपासून गायिका नेहा कक्कड हे नाव चर्चेत आहे. अभिनेता हिमांश कोहली सोबत तिचे रिलेशनशीप आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या ब्रेकअपमुळे नेहा चर्चेत आहे. पण हिमांश सोबत ब्रेकअप झाल्यानंतरही नेहासाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे' खास ठरला.  

नेहाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिचा एक फॅन तिला प्रपोज करताना दिसत आहे. या फॅनचे नाव दीपांशु नारंग आहे. दीपांशु नेहाला फुलांचा गुच्छ आणि कार्ड देताना दिसत आहे. 

व्हिडीओखाली नेहाने लिहिले आहे, 'व्हॅलेंटाइन्स डेच्या रात्री मला बॅकस्टेज एक सरप्राईज मिळाले. मी खूप नशीबवान आहे की, माझ्याकडे तुमच्यासारखे फॅन्स आहेत. neha_holic_deep इन्स्टाग्राम पेजला माझे माझ्या शुभेच्छा.' दीपांशु नेहाच्या नावाने neha_holic_deep इन्स्टाग्राम पेज चालवतो.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Isn’t beautiful #nehakakkarlive in vishakhapatnam #nehakakkar

A post shared by Deepanshu Narang (@neha_holic_deep) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com