NEHA KAKKAR
NEHA KAKKAR

नेहा कक्करचं बंधुप्रेम; घराबाहेरच तयार केलं क्रिकेट पिच

मुंबई - प्रसिध्द गायिका नेहा कक्कर तिच्या गाण्यांशिवाय सोशल मीडियावर पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावरून नव्या गाण्याचे व्हिडीओ आणि इतर फोटोज ती शेअर करत असते. नेहा कक्करचा भाऊ टोनी हासुद्धा प्रसिद्ध गायक आहे. नेहा आणि टोनी या बहिण-भावाच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळते. नेहा कक्करने टोनीला एक हटके गिफ्ट दिलं असून याचा एक फोटोही तिने शेअर केला आहे. 

नेहाचा भाऊ टोनी कक्करला क्रिकेट खेळायची खूप आवड आहे. त्यामुळे नेहाने टोनीला चक्क क्रिकेट पिच गिफ्ट केलं आहे. नेहाने क्रिकेट पिच तयार होतानाचा व्हिडीओ शेअर करून कॅप्शन दिले,' घरीच क्रिकेट पिच! काम जोरात चालू आहे. गिफ्ट कसे वाटले टोनी. तुझी लहान बहिण नेहा.' या पोस्टला नेहाच्या अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. नेहाला इस्टाग्रामवर 53.8 मिलीयन फोलोअर्स आहेत. 

नेहा कक्कर सध्या इंडियन आयडल सिझन 12 मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नेहाचे 'मरजानेया' हे गाणे प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये बिग बॉसची विजेती रूबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी काम केले. हे गाणे सोशल मिडीयावर हिट ठरले. तसेच टोनीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेरा सूट' या गाण्याने सोशल मिडीयवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यातील बिग बॉसचे खेळाडू अली गोनी आणि जासमिन यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com