गायिका सावनी रवींद्रची 'संगीत सम्राट पर्व २' मध्ये महत्वाची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

झी युवा 'संगीत सम्राट पर्व 2' प्रेक्षकांच्या भेटीस येऊन येत आहे. या पर्वात संगीताचा वारसा लाभलेली सुप्रसिध्द गायिका सावनी रवींद्र या कार्यक्रमात कॅप्टनची भूमिका बजावणार आहे.

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा 'संगीत सम्राट पर्व 2' प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नवे पर्व अधिक रंजक बनवण्यासाठी याकार्यक्रमाच्या रूपरेषेत काही बदल करण्यात आले आहेत.

नवे पर्व एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पर्वा मधील एक प्रमुख रंजक बदल म्हणजे या वेळी स्पर्धक हे काही टीम्सचा भागअसणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स असणार आहे. कॅप्टन स्पर्धकांचे मार्गदर्शकच असणार आहेत आणि ते या स्पर्धकांना स्पर्धेसाठी अधिक सक्षमबनवण्यासाठी मदत करणार आहेत. संगीताचा वारसा लाभलेली सुप्रसिद्ध 
गायिका सावनी रवींद्र या कार्यक्रमात कॅप्टनची भूमिका बजावणार आहे. सावनीचे आई वडील हे गायन क्षेत्रातील असल्यामुळे तिला लहानपणापासूनच 
गाण्याचे बाळकडू मिळाले आहे.

savani ravindra

एका सिंगिंग रिऍलिटी शोची फायनलिस्ट असलेली सावनी ही शास्त्रीय 
संगीतात पारंगत आहे. तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. मराठी सोबतच तामिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषांमध्ये देखील गाणी गायलीआहेत. सावनीने अनप्लग्ड सावनी ही सिरीज तिच्या चाहत्यांसाठी चालू केलीआणि चाहत्यांनी तिच्या या सिरीजवर प्रेमाचा वर्षाव केला. सावनी ही पहिली मराठी गायिका आहे जिचे स्वतःचे अँड्रॉईड अॅप आहे.

तिचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास आणि अनुभव स्पर्धकांना नक्कीच 
उपयोगी ठरेल.  संगीत सम्राट पर्व २रे मध्ये कॅप्टनला स्वतःच टीम मध्ये 
कोणाला घ्यायचे ते निवडावे लागणार आहे. प्रेक्षक कार्यक्रमात सावनीला देखीलमंचावरगाताना पाहू शकतील आणि तिच्या गाण्याचा आनंद लुटू 
शकणार आहेत.

सावनी सोबत अजून कुठले गायक कॅप्टनची भूमिका बजावतील याची 
उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer Savani Ravindra plays an important role in Sangeet Samrat Part Two Singing Show