सिंघमने मारली बाजी 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

दिग्दर्शक प्रियदर्शन"ओप्पम' या मल्याळम चित्रपटाचा रिमेक बनवणार आहेत. या चित्रपटातील नायकाच्या रोलसाठी सुरुवातीला किंग खान शाहरूख आणि मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानच्या नावाची चर्चा सुरू होती; मात्र या दोघांना मागे टाकत या चित्रपटातील मुख्य नायकासाठी बॉलीवूडचा सिंघम अर्थात अजय देवगणने बाजी मारल्याची चर्चा आहे.

खुद्द प्रियदर्शन यांनीच एका मुलाखतीत आगामी प्रोजेक्‍ट अजय देवगणसोबत करत असून, सप्टेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याचे संकेत दिले आहेत. हा चित्रपट या वर्षा अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रीलिज होणार असला तरी या प्रोजेक्‍ट संदर्भात अजयकडून काहीच पुष्टी मिळालेली नाही. 

Web Title: Singham will win

टॅग्स