मॅडीने केले घाम न गाळता वजन कमी 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

आरएचटीडीएम फेम आर. माधवन याने बॉलिवूडमध्ये अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत. त्याने केलेले प्रत्येक रोल हे लक्षात राहण्यासारखेच आहेत. मग तो खडूस साला मधला असो नाहीतर तनू वेड्‌स मनू मधला असो. त्याने अतिशय उठावदार भूमिकाच केल्या आहेत तरीही त्याचा रेहेना है तेरे दिल मै मधला मॅडी म्हणूनच तो सगळ्यांना लक्षात आहे. पण आर. माधवन त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत असतो. त्याच्या आगामी विक्रम वेदा या तमिळ चित्रपटासाठीही तो कसून मेहनत करतोय. त्याने घाम न गाळता आपलं वजन कमी केलं आहे. सगळ्यांना आश्‍चर्य वाटलं असेल ना?

आरएचटीडीएम फेम आर. माधवन याने बॉलिवूडमध्ये अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत. त्याने केलेले प्रत्येक रोल हे लक्षात राहण्यासारखेच आहेत. मग तो खडूस साला मधला असो नाहीतर तनू वेड्‌स मनू मधला असो. त्याने अतिशय उठावदार भूमिकाच केल्या आहेत तरीही त्याचा रेहेना है तेरे दिल मै मधला मॅडी म्हणूनच तो सगळ्यांना लक्षात आहे. पण आर. माधवन त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत असतो. त्याच्या आगामी विक्रम वेदा या तमिळ चित्रपटासाठीही तो कसून मेहनत करतोय. त्याने घाम न गाळता आपलं वजन कमी केलं आहे. सगळ्यांना आश्‍चर्य वाटलं असेल ना? इथे आम्ही दोन दोन तास जीम मध्ये जाऊनही काही फरक पडत नाही आणि हा पठ्‌ठ्‌या काहीही न करता कसा काय बारीक झाला? माधवन ने जीम न जॉईन करता फक्त डाएटच्या जोरावर बरेच वजन कमी केले आहे. यासाठी त्याने खास डाएट फॉलो केले. विक्रम वेदा या चित्रपटात त्याला पोलिस विभागातील एन्काउंटर स्पेशालिस्टची भूमिका करायची आहे. 

Web Title: slim mady R.madhavan weight loss