'माझा गर्भपात झाला होता अन्..', 'क्योंकी..' च्या सेटवरील हुकूमशाहीचा अनेक वर्षांनी स्मृती ईराणीकडून खुलासाSmriti Irani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Irani

Smriti Irani:'माझा गर्भपात झाला होता अन्..', 'क्योंकी..' च्या सेटवरील हुकूमशाहीचा अनेक वर्षांनी स्मृती ईराणीकडून खुलासा

Smriti Irani: अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती ईराणीनं अनेक वर्षांनी आता खुलासा केला आहे की तिच्या गर्भपातानंतर एकाच दिवसांत तिला 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेच्या सेटवर हजर रहावं लागलं होतं.

एवढंच नाही तर मेडिकल पेपर्सही शो ची निर्माती एकता कपूर हिला दाखवावे लागले होते. कारण स्मृतीच्या सहकलाकारां पैकी कुणीतरी एकताचे कान भरले होते की स्मृती खोटं बोलत आहे.

स्मृती तेव्हा 'रामायण' या मालिकेतही काम करत होती, ज्याचे दिग्दर्शक होते रवि चोप्रा . त्यांनी मात्र स्मृतीला कामावर न येता आराम करण्याचा सल्ला दिला होता.( Smriti Irani on miscarriage and Pregnancy during saas bhi kabhi bahu thi)

स्मृती ईराणीनं 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेत तुलसी ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या मालिकेमुळे तिला देशातील घराघरात ओळखलं जाऊ लागलं होतं, 'रामायण' मालिकेत ती देवी लक्ष्मीच्या भूमिकेसोबत सीतेच्या रुपातही दिसली.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्मृतीनं बोलताना सांगितलं आहे की गर्भपातानंतर मला माणूसकी नक्की काय असते याविषयी मोठी शिकवण मिळाली.

ती म्हणाली की तिला आपल्या प्रेग्नेंसीविषयी माहित नव्हतं. तिला फक्त अनेकदा काम करताना अस्वस्थ वाटायचं.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

स्मृती ईरानी पुढे म्हणाली,''मला माहित नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे. मी सेटवर होते(क्योंकी सास भी कभी बहू थी) आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही आणि मला घरी जायची परवानगी द्यावी, पण जोपर्यंत परवानगी दिली गेली नाही तोपर्यंत मी काम केलं. आणि तेव्हा संध्याकाळ होत आली होती, डॉक्टरांनी मला फोनवर सोनोग्राफीचा सल्ला दिला''.

'' रस्त्यातच मला ब्लीडिंग सुरू झालं. आणि मला आजही आठवतंय तेव्हा खूप पाऊस पडत होता. मी रिक्षा थांबवली आणि ड्रायव्हरला हॉस्पिटलला न्यायला सांगितलं. तिथे पोहोचल्यावर एक नर्स माझ्याजवळ धावत तर आली पण ऑटोग्राफ घ्यायला. तिला मी ऑटोग्राफ दिला आणि म्हटलं,मला अॅ़डमिट करुन घेणार का..मला वाटतंय माझा गर्भपात झालाय''.

अभिनेत्री त्यावेळी डबल शिफ्टमध्ये काम करत होती. जेव्हा तिनं रवी चोप्राला आपल्या परिस्थिती विषयी सांगितलं तेव्हा त्यांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला.

स्मृती म्हणाली, ''रवी सर म्हणाले,तुझं डोकं फिरलंय का. तुला माहितीय का आपल्या मुलाला गमावण्याचं दुःख काय असतं. तु आता त्या दुःखातून जातेयस. उद्या तुला शूटवर यायची गरज नाही. मी मॅनेज करीन''.

स्मृती ईराणी पुढे म्हणाल्या, ''खरंतर क्योंकी सास भी कभी बहू थी मालिकेचं शेड्युल पुढे ढकलणं शक्य होतं. कारण यात इतर ५० व्यक्तिरेखा होत्या. पण' रामायण' मालिकेचं तसं नव्हतं''.

स्मृतीला तेव्हा क्योंकी..च्या टीममधून फोन आला होता आणि तिची तब्येत ठीक नसताना..तिचा गर्भपात नुकताच झाला असताना ...कुठलीही दखल न घेता तिला शूटवर येण्यास सांगितलं गेलं.

शेवटी स्मृती नाइलाजानं 'क्योंकी सास भी कभी बहू थी' च्या सेटवर गेल्या आणि तिल कळालं की तिच्याच एका सहकलाकारानं शो ची निर्माती एकता कपूरला तिच्या प्रेग्नेंसी आणि गर्भपाताची बातमी खोटी आहे असं सांगितलं होतं.

त्या व्यक्तीला माहित नव्हतं मी सेटवर परत आलेय कारण तेव्हा मला घराचे हफ्ते भरायचे होते. पैशांची मला नितांत गरज होती. दुसऱ्या दिवशी मी माझे सगळे मेडिकल रिपोर्ट्स घेऊन एकताला दाखवले.

''कारण मला तिला सांगायचं होतं की माझा गर्भपात खोटा नाही. एकताला खूप कसंतरी वाटलं.,'ती म्हणाली,पेपर नको दाखऊस..'

मी तिला म्हणाली,''माझ्या पोटातील गर्भ आता माझ्यासोबत नाही..नाहीतर तो ही दाखवला असता.''