दयाबेनचा व्हिडीओ शेअर करत स्मृती ईराणींचा विवाहित जोडप्यांना मजेदार सल्ला, म्हणाल्या..Smriti Irani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Irani funny Post

Smriti Irani: दयाबेनचा व्हिडीओ शेअर करत स्मृती ईराणींचा विवाहित जोडप्यांना मजेदार सल्ला, म्हणाल्या...

Smriti Irani: अभिनेत्री आणि राजकीय नेता स्मृती ईराणी आजही आपली पहिली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिकेमुळे ओळखली जाते. आदर्श सून तुलसी विरानी बनून स्मृती ईराणीनं घराघरात आपली छाप पाडली होती.

अर्थात,आता ती या ग्लॅंमरस जगापासून लांब आहे पण लाइमलाइटमध्ये ती आजही आहे हे नाकारता येणार नाही. नुकताच तिनं वैवाहिक जोडप्यांना सल्ला दिला आहे,जो ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांची हसून पुरती वाट लागली आहे.

स्मृती ईराणी अनेकदा सोशल मीडियावर मजेदार पोस्ट शेअर करताना दिसते. कधी कधी मजेदार कॅप्शन देत सेल्फी शेअर करते तर कधी काही व्हिडीओ शेअर करत स्मृती ईराणी आपल्या सेन्स ऑफ ह्युमरनं सगळ्यांचे मन जिंकते. आता देखील तिनं असंच काहीसं केलं आहे. (Smriti Irani Post for married people share dayaben video funny post)

Smriti Irani funny Post

Smriti Irani funny Post

स्मृती ईराणीनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील दयाबेन आणि जेठालालचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जेठालाल,दयाबेनला म्हणताना दिसत आहे की,'जेव्हा देव बुद्दीचं वाटप करत होता तेव्हा तू कुठे होतीस..'

यावर दयाबेन म्हणताना दिसते,'तुमच्यासोबत फेरे घेत होती'. यासोबत आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यात दाखवलं गेलं आहे की लाडू खाल्ल्यानंतर जेठालाल दयाबेनच्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य होतं. व्हि़डीओला कॅप्शन देत लिहिलं आहे की,'या स्टोरीमधनं हेच कळतं की,ज्या लोकांनी सात फेरे घेतले आहेत,त्यांनी बदाम खायला हवेत'.

या व्हिडीओसोबतच त्याच्या कॅप्शनवरनं हशा पिकला आहे. त्यांना स्मृती ईराणींचा हा विनोदी व्हिडीओ भलताच आवडला आहे. एवढंच नाही तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत तारक मेहता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सचिन श्रॉफला देखील हा व्हिडीओ पाहून आपले हसू आवरता आले नाही.

माहितीसाठी इथे सांगतो की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो गेल्या १५ वर्षांपासून छोट्या पडदयावर राज्य करत आहे. गेल्या वर्षभरात मात्र या मालिकेशी जोडल्या गेलेल्या अनेक कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली आहे,पण चाहत्यांचा मालिकेविषयीचा उत्साह काही कमी झालेला नाही.