स्मृती इराणींना या मराठी मालिकेची भूरळ; केला व्हिडिओ शेअर

टीम ईसकाळ
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

आई आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीत किती महत्त्वाची आहे, हे तिने समजावून सांगितलंय. स्मृती इराणींना हा सीन भावला आणि त्यांनी तो चक्क आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

मराठी मालिका या सर्वांनाच प्रिय असतात... अशातच झी मराठीवरील 'अग्गं बाई सासूबाई' या मराठी मालिकेची भूरळ चक्क केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही पडली आहे. निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका चक्क इराणींनी कौतुक केल्यामुळे चर्चेत आली आहे.

मोदींवर पुन्हा बायोपिक! हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार निर्मिती

'अग्गं बाई सासूबाई' या मालिकेत सासू-सुनेचं एक छान नातं दाखवलं, तर आई-मुलाचंही प्रेमळ नातं दाखविण्यात आलं आहे. यातील एका भागात तेजश्री आपल्या नवऱ्याला आईचे महत्त्व सांगताना दाखवली आहे. आई आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीत किती महत्त्वाची आहे, हे तिने समजावून सांगितलंय. स्मृती इराणींना हा सीन भावला आणि त्यांनी तो चक्क आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

'Aai/ माँ / Mom — language अनेक feeling एक' असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलंय. अनेक वेळा आपण आईला मजेत बोलून जातो, की घरात दिवसभर बसून काय करते... मात्र सतत घरात राहणारी आई आपल्या मुलांसाठी, घरातल्यांसाठी किती काय-काय करते याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. घरात कोणी आजारी असेल तर तिच्या डोळ्याला डोळा लागत नाही. इतकंच नाही तर ती आजारी असताना सुद्धा केवळ आपल्या घरातल्यांसाठी स्वत:च दुखणं दूर सारते. तरीदेखील आपला कायम प्रश्न असतो की तू काय करतेस?, या घटनेवर आधारित एक भाग प्रसारित करण्यात आला. हा भाग पाहिल्यानंतर स्मृती इराणी यांना त्यांच्या लोकप्रिय ‘तुलसी’ या मालिकेची आठवण आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smriti irani shares scene from marathi serial agga bai sasubai on her social media