सामाजिक प्रश्‍नावर भाष्य करणारा चित्रपट "शामची शाळा' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई : साईनाथ चित्र निर्मित, किशोर म्हसकर गुरुजी प्रस्तुत आणि प्रकाश जाधव दिग्दर्शित "शामची शाळा' चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्‍नावर भाष्य करण्यात आले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

मुंबई : साईनाथ चित्र निर्मित, किशोर म्हसकर गुरुजी प्रस्तुत आणि प्रकाश जाधव दिग्दर्शित "शामची शाळा' चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्‍नावर भाष्य करण्यात आले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 
"शामची शाळा' चित्रपटाची कथा इमारत बांधकाम करणाऱ्या मजुराचा मुलगा शामच्या भोवती फिरते. त्याला शाळेत जायचे असते. त्याचे वडील शिक्षणाविरोधात असतात. शामची ओळख पूर्वा नावाच्या मुलीशी होते. ती त्याला शाळेत प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करते आणि निवृत्त चित्रकला शिक्षक मानकर मास्तर त्याला पूर्वाच्या विनंतीमुळे मार्गदर्शन करतात. शामच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते, असे वाटत असतानाच त्याच्यासमोर अनेक अडचणी येतात. त्यावर तो कसा मात करतो हे या चित्रपटात दाखवले. 
या चित्रपटाची कथा किशोर ठाकूर यांची असून पटकथा परेश बोभाटे यांची; तर संवादलेखन महेंद्र पाटील आणि श्रीकांत गुर्जर यांनी केले. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व संकलक प्रकाश जाधव आहेत. चित्रपटात त्यांनी रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांना संधी देऊन त्यांच्याकडून उत्तम काम करून घेतले. संगीतकार श्रीरंग आरस यांनी संगीत दिले असून संजीवनी भेलांडे यांच्या मधुर स्वरात यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. किशोर म्हसकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रकार त्रिलोक चौधरी आहेत. या चित्रपटात विजय पाटकर यांच्यासह अरुण नलावडे, निशा परुळेकर, मिलिंद शिंदे, यश सावंत देसाई, श्रेया जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  
 

Web Title: social awareness movie shamachi shala