सोशल घबराट: तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये मोहंमद अली अबदेलवाहाब आहे का?

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 जुलै 2017

गेल्या दोन दिवसांपासून फेसबुकवर सध्या मोहंमद अली अबदेलवाहाब नामक इसमाच्या अकाउंटची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मराठी सिनसृष्टीतील अनेक कलाकार, पत्रकारांच्या फ्रेंडलिस्टमध्ये नकळत तो घुसला आहे. हा इसिसचा माणूस आहे इषपासून तो व्हायरस आहे, आपले अकाऊंट तो हॅक करतो अशा अनेक चर्चांना सोशल साईटवर उधाण आहे आहे. 

पुणे: गेल्या दोन दिवसांपासून फेसबुकवर सध्या मोहंमद अली अबदेलवाहाब नामक इसमाच्या अकाउंटची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मराठी सिनसृष्टीतील अनेक कलाकार, पत्रकारांच्या फ्रेंडलिस्टमध्ये नकळत तो घुसला आहे. हा इसिसचा माणूस आहे इथपासून तो व्हायरस आहे, आपले अकाऊंट तो हॅक करतो अशा अनेक चर्चांना सोशल साईटवर उधाण आहे आहे. 

चिन्मय मांडलेकर याची पत्नी नेहा हिने फेसबुकवर मोहंमदच्या अकाउंटचा स्क्रिनशाॅट काढून या इसमाला तातडीने डीलीट करण्याची सूचना केली आहे. विशेष बाब अशी की त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या सिनेसृष्टीत अनेकांना टॅग केले आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे उघडले. हा इसम कोण आहे, याची कोणतीही माहीती कुणाला नाही. अनेकांनी या अकाउंटबद्दल फेसबूकककडे रिपोर्ट केला आहे. 

दिग्दर्शक विजू माने, सतीश राजवाडे, गजेंद्र अहिरे, निवेदिता सराफ, शंतनू मोघे, कॅमेरामन महेश लिमये, शिल्पा तुळसकर आदी अनेकांच्या फ्रेंडलिस्टमध्ये हा इसम आहे. याशिवाय याबद्दल व्हाॅट्सअॅपवरही जागृती चालू आहे. मोहंमद हा इसम इजिप्तचा असून, त्याच्या अकाउंटवर अरेबिक भाषेत काही मजकूर लिहिलेला दिसतो. सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याला अनफ्रेंड केले आहे. पण तो ब्लाॅक होत नसल्याचेही अनेकांच्या निदर्शनास आले आहे. अभिनेत्री चिन्मयी सुमितसह अनेकांनी फेसबुककडे याबद्दल तक्रार केली आहे. 

आता फेसबुक याबाबत काय निर्णय घेते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Social media mohmad ali abdelwahab esakal news