अश्लिल व्हिडिओ पाहणारे पुरुष... सोफियाचं धक्कादायक वक्तव्य

बिग बॉसमध्ये लोकप्रिय झालेल्या सोफियानं (Sofiya Hayat) आता एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Actress Sofiya Hayat
Actress Sofiya Hayat

Bigg Boss 15: बिग बॉसमध्ये लोकप्रिय झालेल्या सोफियानं (Sofya Hayat) आता एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील तिनं केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांचे (Social Media News) लक्ष वेधून घेतले होते. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यं आणि फोटो, व्हिडिओसाठी (Viral video) ओळखल्या जाणाऱ्या सोफिया हयातचा चाहतावर्ग मोठा आहे. नियमितपणे अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या पुरुषांविषयी सोफियानं धक्कादाक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहे. सोफिया काय म्हणाली, हे आपण जाणून घेणार आहोत.

सोफिया म्हणते, जे पुरुष नियमितपणे अश्लील व्हिडिओ पाहतात त्यांना योग्यप्रकारे किस करता येत नाही. तिच्या या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी सोफियाला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. यापूर्वी सोफियानं बिग बॉसचा होस्ट आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खानवर, करण जोहरवर जहरी टीका केली होती. बॉलीवूडमध्ये ज्या बी ग्रेड मुव्हीज तयार केल्या जातात त्या करताना फसवणूकीचे प्रकार होत असल्याची प्रतिक्रिया सोफियानं दिली आहे. फिल्मीबीटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोफियानं काही खळबळजनक खुलासे केले आहेत.

Actress Sofiya Hayat
Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

आपण केलेल्या वक्तव्याला सोफियानं वैयक्तिक अनुभवाचा दाखलाही दिला आहे. त्यामुळे ती आणखीनच ट्रोल होत आहे. मी जेव्हा अठरा वर्षांची होते तेव्हा एका मुलाला किस केलं होतं. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि माझ्याजवळ आला. मात्र त्यावेळी मलाही काही कल्पना नव्हती की, काय होत आहे....त्या मुलाचा अंदाज मला मला त्यावेळी अजिबात आवडला नव्हता. त्यावरुन मी सांगु शकते की, अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये अनेक उणीवा जाणवतात, दिसून येतात.

Actress Sofiya Hayat
Pushpaच्या 'उ अंतवा' गाण्यावर नवरा-नवरीचा जबरदस्त डान्स Viral!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com