सनी लिओनीच्या 'वीरमादेवी' सिनेमावर टांगती तलवार; संघटनांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सनी लिओनीला ‘वीरमादेवी’ सिनेमात घेण्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. या सिनेमातून सनी लिओनी तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मात्र सनीला सिनेमातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका दाक्षिणात्या सिनेमातून झळकणार आहे. 'वीरमादेवी' नामक या सिनेमात सनीची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा चोल साम्राज्याचे शासक राजेंद्र पहिले यांची पत्नी दक्षिण भारताची वीरांगणा 'वीरमादेवी' यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यात वीरमादेवीची भूमिका सनी निभावणार आहे. पण हा सिनेमा प्रदर्शित होण्यापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

Veermadevi

सनी लिओनीला ‘वीरमादेवी’ सिनेमात घेण्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. या सिनेमातून सनी लिओनी तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मात्र सनीला सिनेमातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. बंगळुरुत सध्या सनी लिओनी विरोधात वातावरण तापलं आहे. राज्यभरात सुरु असलेल्या निदर्नशनांमुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार आहे.

हिंदू संघटना कर्नाटक रक्षण वैदिके संघटनेने सनी लिओनीला ‘वीरमादेवी’ सिनेमात घेण्याला विरोध केला आहे. ठिकठिकाणी लागलेले सिनेमाचे पोस्टर्स कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटक रक्षण वैदिकेचे कार्यकर्ते हरिश यांनी 'आमचा सनी लिओनीने वीरमादेवी यांची भूमिका निभावण्याला पूर्ण विरोध आहे. वीरमादेवी यांचं एक ऐतिहासिक महत्त्व असून सनीला ती भूमिका न देता, तिला सिनेमातून काढून टाकावे अशी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.' पॉर्न इंडस्ट्रीशी संबंध असलेल्या अभिनेत्रीने ही प्रतिष्ठित भूमिका निभावण्यावरुन काही संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमासाठी हजारो कोटी खर्च करण्यात आले आहेत. तसेच हॉलिवूड चित्रपट ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’चे तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some organizations oppose Sunny Leones Veeramadevi movie