सोनाक्षीला आवडे बॉलीवूड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

आजकाल सगळे बी टाऊन मधले कलाकार हॉलीवूडमध्येही संधीच्या शोधात आहेत; पण आपली "दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा मात्र बॉलीवूडच्याच प्रेमात आहे. तिचा लवकरच "नूर' नावाचा चित्रपट प्रदर्शित होणारेय. त्यात ती पाकिस्तानी पत्रकराची भूमिका करतेय. तिला हॉलिीवूडबद्दल प्रश्‍न विचारला असता ती म्हणते, "मी बॉलीवूडमध्येच खूश आहे. मला सध्या तरी हॉलीवूडचा ध्यास नाही. जे बॉलीवूड स्टार्स हॉलीवूडमध्ये जातायत, त्यांच्यासाठी मी खूप खूश आहे. पण मला आता तरी तिथे जायचं नाही.

आजकाल सगळे बी टाऊन मधले कलाकार हॉलीवूडमध्येही संधीच्या शोधात आहेत; पण आपली "दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा मात्र बॉलीवूडच्याच प्रेमात आहे. तिचा लवकरच "नूर' नावाचा चित्रपट प्रदर्शित होणारेय. त्यात ती पाकिस्तानी पत्रकराची भूमिका करतेय. तिला हॉलिीवूडबद्दल प्रश्‍न विचारला असता ती म्हणते, "मी बॉलीवूडमध्येच खूश आहे. मला सध्या तरी हॉलीवूडचा ध्यास नाही. जे बॉलीवूड स्टार्स हॉलीवूडमध्ये जातायत, त्यांच्यासाठी मी खूप खूश आहे. पण मला आता तरी तिथे जायचं नाही. आणि पुढे काय होईल काही सांगता येत नाही.' तिने कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही; पण तिचा हा इशारा प्रियांका आणि दीपिकाकडेच होता. 
 

Web Title: Sonakshi likes bollywood