सोनाक्षी करणार आपल्या चित्रांचे प्रदर्शन

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मुंबई - प्रियांका चोप्रने गायलेल्या 'बाबा' गाण्याने प्रक्षकांची मने जिंकली. बॉलिवूड अभिनेत्रींची वेगळी बाजू यानिमित्ताने रसिकांसमोर येत आहे आणि त्याला भरभरुन दाद देखील मिळत आहे. सोनाक्षी सिन्हा देखील रसिकांची मने जिंकण्यासाठी आता सज्ज झाली आहे. परंतु, गाण्याच्या नव्हे तर आपल्या चित्रांच्या माध्यमातून...

अभिनयापलिकडे सोनाक्षीला चित्र काढण्याचा छंद आहे. याच चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

या प्रदर्शनात तिने काढलेली जवळजवळ 30 चित्रे ठेवण्यात येणार आहेत. यासाठी सोनाक्षीने आपल्या चित्रांसोबतचे एक वेगळ्या प्रकारचे फोटोशूट देखील केले आहे. 

फोटो सौजन्य - सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonakshi Sinha to exhibit her paintings