'ये तुम्हे दंगे दिखाई देते है?'; शेतकरी आंदोलनासंदर्भात सोनाक्षीने वाचलेली कविता व्हायरल

sonakshi sinha
sonakshi sinha

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राजकीय व्यक्तींपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण यावर व्यक्त होत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि त्याच्या विरोधात असे दोन गट सोशल मीडियावर तयार झाले आहेत. अशातच आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने शेतकऱ्यांसाठी एक कविता वाचली आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कवितेचा व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. 

सोनाक्षी सिन्हाची पोस्ट- 
वरद भटनागर यांनी लिहिलेली ही कविता सोनाक्षीने वाचली आहे. 'क्यों' असं या कवितेचं शीर्षक आहे. 'क्यों, सब पुछते है क्यों, क्यों हम सडकों पे उतर आए है,' असे या कवितेचे बोल आहेत. आपल्या अन्नाची व्यवस्था करणाऱ्या त्या हातांसाठी ही कविता समर्पित आहे, असं सोनाक्षीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. या व्हिडीओला आठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोशल मीडियावरील ट्रोलिंगला वैतागून सोनाक्षीने ट्विटर अकाऊंट बंद केलं होतं. तेव्हापासून ती इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय आहे. सोनाक्षीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशींवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आंदोलनासंदर्भात ट्विट्स केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com