सोनाक्षी सिन्हाच्या अटकेचा व्हिडिओ; सोशल मीडियावर धूम

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनाक्षीला अटक करून घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही मला अटक करु शकत नाही. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही मला असं कसं अटक करु शकता? असे बोलताना सोनाक्षी या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मुंबई : सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनाक्षीला अटक करून घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही मला अटक करु शकत नाही. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही मला असं कसं अटक करु शकता? असे बोलताना सोनाक्षी या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर #AsliSonaArrested #SonakshiSinhaArrested असे हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहेत. परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी अखेर सोनाक्षीला काय घडले हे सांगावे लागले आहे.
 

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे नक्की काय घडले आहे याचा खुलासा केला आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर माझ्या अटकेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतू हे संपूर्ण सत्य नाही. मी घटनेचा लवकरच खुलासा करणार आहे असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonakshi Sinha Open Up About His Arrested Video