"पलटन'मध्ये लव सिन्हा 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हा "पलटन' चित्रपटात झळकणार आहे. ही माहिती खुद्द सोनाक्षीने ट्विटरवर दिली.

तिने लिहिलंय, ही माहिती देताना खूप अभिमान वाटतोय की माझा भाऊ लव निर्माता-दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या युद्धकथेवर आधारित "पलटन' चित्रपटात काम करणार आहे.

जेपींनी बॉर्डरसारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट बनवला आहे आणि युद्धावर आधारित चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

नुकतेच त्यांनी आगामी चित्रपट "पलटन'चा फर्स्ट लूक सादर केला. या चित्रपटात अभिषेक बच्चन, गुरमीत चौधरी आणि सोनू सूद हे कलाकार काम करणार असल्याचं बोललं जातंय. अभिषेकने यापूर्वी जेपी दत्ता यांच्यासोबत "रेफ्यूजी', "उमराव जान' आणि "एलओसी कारगील' या चित्रपटात काम केलेलं आहे. या वर्षाअखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि पुढील वर्षी तो प्रदर्शित होईल. 

Web Title: Sonakshi Sinha's brother Luv Sinha part of JP Dutta's 'Paltan'