'के. एल. राहुल चांगला, पण आमच्यात तसं काही नाही...'

वृत्तसंस्था
Wednesday, 29 May 2019

भारतीय संघाचा फलंदाज के. एल. राहुल व 'जन्नत'फेम बॉलीवूड अभिनेत्री यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. पण तिने या चर्चेला पूर्णविराम देत मौन सोडलं आहे.

क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं हे वर्षानुवर्षेचं आहे. अझरूद्दीन-संगीता बिजलानी, विराट-अनुष्का, झहिर खान-सागरिका घाटगे, हरभजनसिंग-गीता बसरा, युवरागसिंग-हेजल किच या जोड्यांनंतर आता भारतीय संघाचा फलंदाज के. एल. राहुल व 'जन्नत'फेम बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. पण तिने या चर्चेला पूर्णविराम देत मौन सोडलं आहे.

 sonal chauhan

सोनल चौहानने तिला राहुलसोबतच्या अफेअरबाबत विचारले असता, तिने त्यावर नकार देत, 'आमच्यात तसे काही नाही. तो उत्तम क्रिकेटर, टॅलेंटेड आणि चांगला मुलगा आहे,' अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्यांच्यातील अफेअरची ही अफवा असल्याचे सोनल सांगितले. 

सोनलशिवाय यापूर्वी राहुलचे निधी आग्रवाल व आकांशा कपूर यांच्यासोबतही नाते असल्याच्या चर्चा होत्या. पुन्हा एकदा सोनलसोबत्या नात्यामुळे या चर्चेला उधाण आले. 'कॉफी विथ करण' या रिअॅलिटी शोमध्ये हार्दिक पांड्यासोबत महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राहुलचे संघातून त्याचे निलंबन करण्यात आले होते.

Rahul Sonal

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonal Chauhan open on rumors of affair with K L Rahul