Sonalee Kulkarni: मराठी भाषेवरून सोनालीवर पुन्हा सडकून टीका, जुनी पोस्ट होतेय व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonalee Kulkarni again trolled for her old post about marathi bhasha din and praman marathi

Sonalee Kulkarni: मराठी भाषेवरून सोनालीवर पुन्हा सडकून टीका, जुनी पोस्ट होतेय व्हायरल..

sonalee kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. गेली काही दिवस ती सातत्याने चर्चेत आहे. मग तिचे लग्न असो, हनीमून असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी. ती कायमच चाहत्यांशी जोडली गेलेली असते.

मध्यंतरी तिचा 'तमाशा लाईव्ह' चित्रपट येऊन गेला, तर लवकरच ती 'महाराणी ताराराणी' यांच्या चरित्रावर चित्रपट करणार आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा ती समजातील घडामोडींवरही लिहीत अडते.

यासाठी कलाकारांना अनेकदा ट्रोलही केलं जातं. पण आज एक अजब घटना घडली आहे, सोनाली ने कोणतीही पोस्ट न करता ती प्रचंड ट्रोल होत आहे. विषय आहे नुकताच झालेला मराठी भाषा दिवस..

(Sonalee Kulkarni again trolled for her old post about marathi bhasha din and praman marathi )

झाले असे की 'सोनालीने गेल्या वर्षी मराठी भाषा दिनी एक पोस्ट शेयर केली होती.ज्यामध्ये प्रमाण मराठी आणि बोली भाषा यांच्यातील भेद दाखवून प्रमाण मराठीच कशी बरोबर हे दाखवले होते.त्यावरून तिला प्रेक्षकांनी खूप ट्रोल केले होते. स्वतःची भाषा आधी सुधार म्हणत तिच्यावर सडकून टीका झाली होती. नंतर ती पोस्ट सोनालीने डिलिट केली.पण आता त्याच पोस्टने सोनालीला पुन्हा अडचणीत आणले आहे.

काल झालेल्या भाषादिनी अनेकांनी त्या पोस्ट चे स्क्रीनशॉट शेयर केले आहेत.सोनाली कशा पद्धतीने जातीवादी लिहिते, प्रमाण मराठी सोडून बोली भाषेला असा खालचा दर्जा देणारी सोनाली अशा टीका तिच्यावर होत आहेत. अनेकांनी तिच्या विचारांना कद्रू, कोते विचार असेही म्हंटले आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे, अगदी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरि नरके आणि पत्रकार निखिल वागळे यांनीही ही पोस्ट शेयर केली आहे.

सोनालीची जुनी पोस्ट काय होती?

न आणि ण, श आणि ष, ळ आणि ड, चांदणीमधील च आणि चंद्रामधील च, जहाजामधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणार्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्च्या!!! अशी पोस्ट तिने गेल्या वर्षी केली होती. आता तीच पोस्ट पुन्हा व्हायरल झाली असून सोनालीवर टीका होत आहे.

टॅग्स :Sonalee Kulkarni