'फॅमिली सोबत पाहू शकत नाही, त्या 'शो' मध्ये काम कसं करू?'

Sonalee Kulkarni
Sonalee KulkarniBestseller Amzon Prime

मराठीमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या बेस्टसेलर थ्रिलरमध्ये दिसणार आहे. तिने साम टिव्ही शी तिचा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम करतानाचा अनुभवाबद्दल सांगितले. शोच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी बोलताना सोनाली म्हणाली, ''मी खूप उत्सुक आहे या सीरीजसाठी. ट्रेलरच बघून खूप थ्रिलींग वाटतयं. मी घरी येऊन, मोठ्या स्क्रिनवर तो पाहीला.'' (Sonalee Kulkarni on Bestseller Amazon Prime Show)

ती पुढे म्हणाली की, ''मला अचानक एक दिवस कॉल आला की एक नवीन सीरीज येत आहे, त्यात मिथुन चक्रवरती आहेत, बिग बजेट शो आहे. एक पोलीसांचा रोल आहे, तर ते ऐकूनच माझ्या भुवया उंचावल्या.'' आपण कधी अशी भुमिका केली नाहीये, त्यात OTT वर कधी काम केले नाहीये, असे तिला वाटले.

ती म्हणाली, ''खरं सांगायचं झालं तर मी ऑडीशन्सच्या बाबतीत फार आळशी आहे. मला तयार होऊन जावा मग ऑडीशन द्या...हे खूप कंटाळवाणे वाटते. पण या शोच्या वेळी मी तसं काहीही न करता, लगेच स्क्रिन टेस्टसाठी गेले. या आधीही मला बऱ्याच ओटीटीच्या ऑफर्स आल्या आहेत पण, मी काही गोष्टी करण्यास कम्फर्टेबल नसल्याने मी नकार दिले.''

तिचे एक मृद वाक्य आहे की, जो सिनेमा, जी मालिका, जो शो ती तिझ्या फॅमिली सोबत बसून पाहू शकत नाही तिला त्याच्यात काम नाही करायचायं. इतके सरळ सोपे गणित आहे ते तिच्यासाठी.

Sonalee Kulkarni
अमिताभ यांच्या नातीनं केला कुटुंबाबाबत मोठा गौप्यस्फोट, मला नेहमीच...

पण या शोची गोष्ट, गुढता हे मजेशीर असल्याकारणाने बाकी कशाची गरज भासणार नाही. सेटवरील वातावरण मस्त होते पण शूटिंग खूपच आव्हानात्मक होते. आम्ही घराबाहेर शूटिंग करत असल्यामुळे आम्हाला सेटवर खूप वेळ मिळाला. आमची कास्ट सर्व गोष्टींचे मिश्रण आहे – मिथुन दा (Mithun Chakraborty) बंगालचे आहेत, गौहर (Gauhar Khan), श्रुती (Shruti Hasaan) आणि अर्जन (Arjan) हे दक्षिणेचे आहेत आणि मी महाराष्ट्रातील आहे – हे वेगवेगळ्या लोकांचे सुंदर एकत्रीकरण होते.” तिने पुढे जोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com