
women's day 2023: केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी.. जागतिक महिला दिनी सोनालीची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय..
आज 'जागतिक महिला दिन'. हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे नाहित. त्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. स्त्रीनं तिचं कतृत्व हे नेहमीच सिद्ध केलं आहे.
आज महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही यात मागे नाहीत. त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातुन महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यात मराठी मनोरजंन विश्वातील लोकप्रिय चेहरा सोनाली कुलकर्णीनंही पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाले. खर तरं सोनाली महाराणी ताराराणी यांच्या भुमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाचा टिझर रिलीज झालाय.
या निमित्त तिने तिचे काही फोटो पोस्ट करत लिहिलयं की, "भारतीय इतिहासातील दमदार पात्रांपैकी एक असलेल्या या स्त्रीला पोर्तुगीजांनी 'रैन्हा डोस मराठे' किंवा 'मराठ्यांची राणी' असेही संबोधले होते. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीररावांच्या शूर कन्या आणि भारतातील सर्वात महान मध्ययुगीन सम्राटांपैकी एक आहेत.
अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल. मराठ्यांचा उदय-अस्त पाहणारी स्त्री."
पुढे ती लिहिते, "आपल्या राज्याप्रती अत्यंत समर्पित असलेल्या अदम्य योद्धा महाराणी ताराबाईंनी मराठा महासंघाला अगदी खालच्या पातळीवर असताना विघटित होण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रीय सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या एकट्यानं जगातील सर्वात पराक्रमी शासक औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठ्यांचा प्रतिकार केला."
मी हा #जागतिकमहिलादिन त्यांना आणि त्यांच्या सारख्या स्त्रियांना समर्पित करते ज्या केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात.'
तिची ही पोस्ट व्हायरल झाली असून तिनं लिहिलेल्या या कॅप्शन सर्वांनाच आवडत आहे. सर्वांनी तिला कमेंटमध्ये महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.