मराठी कलाकारांचा 'झिम्मा'; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

jhimma
jhimma

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच नव्या कल्पना प्रेक्षकांसमोर मांडतो. 'पोश्टर गर्ल', 'बघतोस काय मुजरा कर', 'चोरीचा मामला' हे हेमंतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. नुकताच हेमंतच्या 'झिम्मा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये मराठीतील कलाकारांची फौजच पाहायला मिळतेय. हा पोस्टर हेमंतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेमंतने या फोटोला कॅप्शन दिले की, 'असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. आता या नव्या वर्षात, नवे आपण, खेळूया.. 'झिम्मा' 23 एप्रिल पासून!' 

झिम्मा चित्रपट हा या नवीन वर्षातील बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असणारा चित्रपट आहे. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी 4 नोव्हेंबरला हेमंतने झिम्माचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, मृन्मयी गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास जोशी हे प्रसिध्द कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील वेगळ्या संस्कृतीमध्ये वाढलेल्या 7 महिला एका टुरिंग कंपनीसोबत ब्रिटनला सहलीला जातात. त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडते, त्या कशी धमाल मस्ती करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा  दिग्दर्शक हेमंत ढोमेने  शेअर केलेल्या हटके पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.  

क्षिती जोग, स्वाती घोपकर, चलचित्र कंपनी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. इरावती कर्णीक यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com