sonalee kulkarni: सोनालीच्या 'बकुळा'ला 15 वर्षे पूर्ण.. शेअर केली खास पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonalee kulkarni shared post about her first movie bakula namdev ghotale complete 15 years

sonalee kulkarni: सोनालीच्या 'बकुळा'ला 15 वर्षे पूर्ण.. शेअर केली खास पोस्ट..

sonalee kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. गेली काही दिवस ती सातत्याने चर्चेत आहे. मग तिचे लग्न असो, हनीमून असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी. ती कायमच चाहत्यांशी जोडली गेलेली असते. मध्यंतरी तिचा 'तमाशा लाईव्ह' चित्रपट येऊन गेला, तर लककरच ती महाराणी ताराराणी' यांच्या चरित्रावर चित्रपट करणार आहे. सध्या ती 'डान्स महाराष्ट्र डान्स' या झी मराठी वरील रिएलिटी शोची परीक्षक असून ती समाज माध्यमावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या कामविषयीही भरभरून लिहिली असते. नुकतीच तिने एक पोस्ट केली असून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (sonalee kulkarni shared post about her first movie bakula namdev ghotale complete 15 years )

सोनालीने 2007 मध्ये 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत होते. फुल्ल टू विनोदी असा 'बकुळा' या चित्रपटाने प्रेक्षकांना तर वेड लावलेच पण सोनालीलाही वेगळी ओळख मिळवून दिली. वेंधळ्या नवऱ्याची आणि सावकाराला धडा शिकवणारी 'बकुळा' आजही लोक विसरलेले नाहीत. या चित्रपटाला आज 15 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने सोनालीने एक खास पोस्ट लिहिली आहे.

सोनाली म्हणते, '१५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत “बकुळा” म्हणून प्रवेश केला… आणि तुम्ही तुमच्या मनात घर करू दिलं.. तेव्हा पासून आजतागायत दिलेल्या प्रेमाबद्द्ल मी ऋणी आहे आणि कायम राहणार.. बकुळानामदेवघोटाळे या चित्रपटाने, या भूमिकेने खूप दिलं - पुरस्कारांपासून ते स्वतःची ओळख, चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभं राहण्याची ताकद पासून ते माय बाप रसिक प्रेक्षकांची साथ! हा १५ वर्षांचा प्रवास पुढची कमीत कमी अजून १५ वर्षं असाच सुरू ठेवण्यासाठी तुमची नेहमी सारखी पाठीवर थाप असूद्या, बास.. केदार शिंदे सर तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्यावर घेतलेली मेहनत आणि दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर हा प्रवास मी सुरू करू शकले, याची जाणिव आणि कृतज्ञनता कायम बाळगून ठेवीन,' अशी भावनिक पोस्ट सोनालीने केली आहे.