Sonali Bendre : 'माझी हो नाहीतर पाकिस्तानात घेऊन जाईल!' तिच्या सौंदर्याचा 'तो' होता दिवाना

बॉलीवूडमध्ये एका अभिनेत्रीच्या सौंदर्याची जादु ही केवळ भारतापुरतीच मर्यादित नव्हती तर ती पाकिस्तानपर्यत जाऊन पोहचली होती.
Sonali Bendre birthday
Sonali Bendre birthday esakal

Sonali Bendre bolllywood actress birthday story love story pakistani player : बॉलीवूडमध्ये एका अभिनेत्रीच्या सौंदर्याची जादु ही केवळ भारतापुरतीच मर्यादित नव्हती तर ती पाकिस्तानपर्यत जाऊन पोहचली होती. दोन दशकांहून अधिक काळ त्या अभिनेत्रीनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. कित्येक सेलिब्रेटी तिच्या मागे दिवाने झाले होते.

बॉलीवूडमध्ये ९० च्या दशकांत कित्येक अभिनेत्रीच्या अभिनयाचा आणि सौंदर्यचा जलवा कायम होता. त्यामध्ये माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, रविना टंडन, काजोल, महिमा चौधरी यासगळ्यांमध्ये आणखी एक अभिनेत्री होती जिचे असंख्या चाहते होते. तिचे नाव सोनाली बेंद्रे. आज सोनाली तिचा ४८ वा जन्मदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सोनालीची सुंदरता आणि तिचा अभिनय हा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. सरफरोश, टक्कर, मेजर साब, हम साथ साथ है, सारख्या चित्रपटांमधून सोनाली चाहत्यांच्या कौतूकाचा विषय ठरली. ९० च्या दशकांमध्ये सोनालीवर तर एक पाकिस्तानी क्रिकेटपटू देखील फिदा झाला होता. त्यानं तर तिला थेट त्यांच्या देशात घेऊन जाण्याची धमकी दिली होती.

Sonali Bendre birthday
Shah Rukh Khan Fifa World Cup 2022: 'भांडी घासली, कपडे धुतली' किंग खान फिफामध्ये बोलला!

भलेही एक काळ सोनालीसाठी मोठा खडतर झाला असेल मात्र तिनं येणाऱ्या संकटाला धैर्यानं तोंड दिलं होतं. सोनालीला जीवघेणा कँसर झाला होता. आता ती या आजारातून बरी झाली आहे. १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईमध्ये जन्म झालेल्या सोनालीनं १९९४ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट होता आग. तिला पहिल्याच चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता.

Sonali Bendre birthday
Viral Video : 31st च्या रात्री तरूणाच्या अंगात घुसला मोर; पिसाराही फुलवला

सोनालीचं पहिलं नाव हे प्रसिद्ध सुनील शेट्टीशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर तिचं नाव एका प्रसिद्ध राजकाऱण्याशी जोडलं गेलं होतं. त्याची चर्चाही होती. असं म्हटलं जातं की, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला सोनालीवर प्रेम झालं होतं. तू माझी हो नाहीतर तुला पाकिस्तानात घेऊन जाईल. अशी धमकीही तो देऊन मोकळा झाला होता. एका मुलाखतीमध्ये त्यानं ही गोष्ट सांगितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com