सोनालीची पत्रे सोशल मिडीयावर व्हायरल!

टीम ई सकाळ
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कलाकार जेव्हा एखादी भूमिका साकारत असतो तेव्हा तो त्या चित्रपटाची भूमिका, ते पात्र ते अक्षरशः जगात असतात, त्या पात्रांच्या सुखदुःखाशी ते पूर्णपणे एकरूप झालेले असतात. सहकलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, कलादिग्दर्शक, रंगभूषाकार अशा अनेक सहप्रवाशांच्या साथीने सुरु असलेला हा प्रवास जेव्हा पूर्णत्वास पोहोचतो तेव्हा यानंतर त्या भूमिकेशी असणाऱ्या या नात्याला पूर्णविराम मिळणार म्हणून कलावंताने व्याकुळ होणे स्वाभाविक आहे. अतिशय संवेदनशील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिची ही व्याकुळता आपल्या सहकलाकारांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.

मुंबई:  कलाकार जेव्हा एखादी भूमिका साकारत असतो तेव्हा तो त्या चित्रपटाची भूमिका, ते पात्र ते अक्षरशः जगात असतात, त्या पात्रांच्या सुखदुःखाशी ते पूर्णपणे एकरूप झालेले असतात. सहकलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, कलादिग्दर्शक, रंगभूषाकार अशा अनेक सहप्रवाशांच्या साथीने सुरु असलेला हा प्रवास जेव्हा पूर्णत्वास पोहोचतो तेव्हा यानंतर त्या भूमिकेशी असणाऱ्या या नात्याला पूर्णविराम मिळणार म्हणून कलावंताने व्याकुळ होणे स्वाभाविक आहे. अतिशय संवेदनशील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिची ही व्याकुळता आपल्या सहकलाकारांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.

सोनाली कुलकर्णीने प्रसाद ओक, रवी जाधव, सचिन खेडेकर, मनमीत पेम, चिन्मय मांडलेकर, संतोष फुटाणे, राहुल रानडे, विद्याधर बट्टे, अनिता अशा सर्वांना स्वहस्ताक्षरात लिहिलेली पत्रे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

‘कच्चा लिंबू’ या चित्रपटातील ‘शैलजा काटदरे’ या व्यक्तिरेखेने तिच्या खऱ्या आयुष्यातील आई, मैत्रीण, पत्नी या भूमिकांना नवीन आयाम मिळाल्याचे तिने या पत्रांमधून लिहिले आहे. ही शैलजा साकारण्याची संधी दिल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्याबद्दलची कृतज्ञता तिने या पत्रातून व्यक्त केली. तसेच सोनाली ते शैलजा या प्रवासातील तिचे सहप्रवासी ज्यांच्यामुळे तो प्रवास खुलत गेला आणि तिच्यातली प्रसंगी कणखर तर प्रसंगी हळवी अशी शैलजा तिला सापडत गेली अशा सर्व सहकलाकारांना तिने पत्रं लिहिली आहेत.

Web Title: sonali kulkarni actress letters kachcha limboo esakal news