VIDEO: सोनालीचा 'बिकिनी योगा'! इंस्ट्रक्टरचा घटस्फोट होणार, भन्नाट कमेंटस्|Sonali trolled her bikini yoga video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali video viral

VIDEO: सोनालीचा 'बिकिनी योगा'! इंस्ट्रक्टरचा घटस्फोट होणार, भन्नाट कमेंटस्

Sonali Seygall Viral Video: चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रेटी काहीही करतील असे त्यांच्या व्हिडिओमुळे अनेकदा दिसून आले आहे. त्याला बडे सेलिब्रेटी देखील अपवाद नाही. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगनं केलेलं न्युड फोटोशुट चांगलचं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. ते प्रकरण (Ranveer Singh Photoshoot) रणवीरला एवढं भोवलं की, त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला. सध्या त्याचा तपास पोलीस करत आहे. अशातच आणखी एका सेलिब्रेटीचा बिकीनी योगा (viral social media news) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तिच्या योगाशिक्षकालाच नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रिया देखील भन्नाट आहेत.

प्यार का पंचनामा फेम सोनाली सैगल ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. चाहत्यांच्या चर्चेत असणारी ही अभिनेत्री बऱ्याचदा तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेटकऱ्यांच्या रडारवर असते. आताही तिच्या बिकिनी योगावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिकीनी परिधान करुन कुणी योगा करतं का असा प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारला आहेत. तर काही जणांनी सोनालीच्या बिकीनी योगानं त्या योगा शिक्षकाला घटस्फोट घ्यावा लागेल. अशा गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सोनाली नेहमीच तिच्या फिटनेसंबंधी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेयर करत असते. सोनाली ही तिच्या प्यार का पंचनामा चित्रपटामुळे ओळखली जाते. त्यातून तिनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टीटू की स्वीटीमध्ये देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. सोनाली ही फिटनेस फ्रीक म्हणून तिच्या चाहत्यांना जास्त माहिती आहे. त्यासंबंधी तिनं शेयर केलेल्या अनेक व्हिडिओचं त्यांनी कौतूक केलं आहे.

हेही वाचा: गणपती, आई आणि मी... वाचा भूषणची Exclusive मुलाखत

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये सोनालीनं व्हाईट कलरची बिकीनी परिधान केली आहे. तिचा तो योगा अंदाज नेटकऱ्यांना भलताच भावल्यानं त्यांनी भन्नाट कमेंट्स देऊन सोनालीला ट्रोल केले आहे. याशिवाय तिच्या योगा शिक्षकाला देखील चांगलेच सुनावले आहे. असा योगा शिकवणाऱ्या त्या इन्स्ट्रक्टरचा घटस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. अशी कमेंट केली आहे. एका युझर्सनं म्हटलं आहे की, अजबच लोकं आहेत भारतात. लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करतात.

हेही वाचा: धबधब्यांखाली मनसोक्त भिजायचंय...मग ही आहेत ठिकाणं....

Web Title: Sonali Seygall Pyar Ka Panchnama Fame Actress Trolled Her Bikini Yoga Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..