अनिल कपूर म्हणाला, 'लग्नानंतर सोनम बदलली आहे '

Sonam has changed after her marriage says anil kapoor
Sonam has changed after her marriage says anil kapoor

मुंबई : अनिल कपूर या अभिनेत्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि आताही करत आहे. अनिल कपूरचं वय नक्की आहे तरी किती असा प्रश्न चाहत्यांना अनेकदा पडतो. वयाचा मुद्दा असला तरी अनिल कपूर कोणत्याही तरुण अभिनेत्याला मागे टाकेल अशी त्याची पर्सनालिटी आहे. अनिलला सोनम, रिया आणि हर्षवर्धन ही तीन मुलं आहेत. सोनमचं गेल्या वर्षी लग्न झालं असून ती सध्या लंडनमध्ये राहत आहे. मात्र लग्न झाल्यापासून सोनम बदलली आहे अस अनिलने सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान अनिलने सोनममध्ये कसे बदल झाले आहेत हे सांगितलं आहे. 

सोनम तिचा पती आनंदसोबत सध्या लंडनमध्येच राहतेय आणि फक्त शुटिंगसाठी ती भारतात परतते. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिलला सोनमविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. अनिल म्हणाला, '' दिवाळीमध्ये सोनम घरी मुंबईत आली होती. दिवाळीच्या निमित्ताने एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीची सर्व तयारी सोनम आणि रियानेच केली होती. बॉलिवूडचे अनेक कलाकार या पार्टीमध्ये आले होते आणि पार्टी खूप चांगली झाली.

पुढे तो म्हणाला, ''पण एक गोष्ट आहे ती म्हणजे लग्नानंतर सोनम बदलली आहे. मुंबईत असताना तीने कधीच जेवण वैगरे बनवलं नाही. आता लंडनमध्ये राहायला गेल्यापासून ती जेवण बनवू लागली आहे. तिने तयार केलेले पदार्थ मी अद्याप टेस्ट केले नाहीत मात्र ती खूप चांगलं आणि चविष्ट जेवण बनवते असं मी सर्वांकडून ऐकतोय.'' 

कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये रिया, सोनम आणि हर्षवर्धन हे तिघं पोहोचले होते. त्यावेळी घरातील गमंतीजमती आणि अनिलसोबतचे संबंध कसे आहेत याविषयी त्यांनी सांगितलं होतं.सोनम तिच्या बाबांची म्हणजे अनिलची लाडकी लेक आहे. हर्ष आणि रियापेक्षाही ती लाडकी आहे. 

सोनम बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन आहे. फॅशन सेंसेशन असणारी सोनम तिच्या स्टाइलमध्ये नेहमीच प्रयोग करताना दिसते. नुकताच तिचा 'झोया फॅक्टर' सिनेमा प्रदर्शित झाला. रणबीर कपूरसोबत "सावरिया'' य़ा पहिल्या चित्रपटाने तिनं बॉलिवूडमध्ये पाउल टाकलं. त्यानंतर इन्डस्ट्रीमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली. निरजा, दिल्ली 6, पॅडमॅन, रांजना असे काही सुपरहिट चित्रपट तिने केले. आनंद अहुजा आणि सोनम काही काळ एकमेकांना डेट करत होते. त्यांतर मागच्या वर्षी त्यांनी लग्न केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

All bhaane all day in LA ! @bhaane  and @makeupbybrookehill @mansurgavriel  @the.olio.stories

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com