पाळणा हलला! अभिनेत्री सोनम कपूर झाली आई, अनिल कपूर आजोबा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor-Anand Ahuja blessed with baby boy

पाळणा हलला! अभिनेत्री सोनम कपूर झाली आई, अनिल कपूर आजोबा..

sonam kapoor : गेल्या काही दिवस ज्या बातमीकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले होते. ती गोड बातमी अखेर सर्वांच्या कानावर पडली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतीच आई झाली आहे. तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर सोनमने शनिवारी आपल्या बाळाला जन्म दिला. तिला पुत्रप्राप्ती झाली असून बॉलीवुडसह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .

याबाबत स्वतः सोनम कपूरने माहिती दिली. तिने एक पोस्ट शेयर करून ही आनंदाची बातमी दिली. शिवाय सर्वांचे आभार देखील मानले आहे. तिने त्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, 'आज 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही एका लहान बाळाला जन्म दिला. आमच्या या प्रवासात आमच्यामागे खंबीरपणे उभे असणारे डॉक्टर्स, नर्स, मित्र-परिवार आणि कुटुंबिय यांचे मी आणि आनंद आम्ही मनापासून आभार मानतो. आमचा नवीन प्रवास आजपासून सुरु झाला आहे. आता बाळाच्या येण्याने आमचं आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे.'

केवळ सोनमनेच नाही तर अभिनेता रणबीर कपूरची आई दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर यांनी ही एक पोस्ट शेअर करत अनिल कपूर आणि सुनीता कपूर या दोघांचे अभिनंदन केले आहे. तसेच सोनम आणि आनंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमच्या या आनंदात सर्वजण सहभागी झाले असून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षं सुरू आहे.