सोनमची डोली मुंबईतूनच! 

बुधवार, 18 एप्रिल 2018

सोनमची लगीनघाई जोरात सुरू झाली आहे. सोनमचे संगीतही एकदम ग्रॅंड होणार आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद अहुजा यांच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजू लागलेत. दोघे 6 मे ला स्वित्झर्लंडला लग्न करणार होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. पण आता या दोघांचं लग्न मुंबईतच होणार आहे आणि तेही 29 एप्रिलला.

sonam - anand

सोनमने स्वित्झर्लंडला डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं होतं. पण घरात अनेक जण वयस्कर असल्याने सगळ्यांना एवढा मोठा प्रवास झेपेल की नाही, ही शंका होती. तसंच सगळ्यांना एकत्र घेऊन जाणंही कठीण जात होतं. त्यामुळे या दोघांनी मुंबईतच लग्न करण्याचं ठरवलं आहे.

sonam- anand

आनंद आहुजा दिल्लीमध्ये राहतो. त्याचे सगळे नातेवाईक आणि पाहुणे दिल्लीतीलच आहेत. त्यामुळे मुंबईत लग्न झाल्यावर दिल्लीमध्ये ग्रॅंड रिसेप्शन देण्यात येणार आहे. सोनमची लगीनघाई जोरात सुरू झाली आहे. सोनमचे संगीतही एकदम ग्रॅंड होणार आहे. फराह खान तिच्या संगीत सोहळ्याची कोरिओग्राफी करणार आहे; तर सोनमचे आई-वडीलही डान्स करणार आहेत. करण जोहर 'प्रेम रतन धन पायो' या गाण्यावर डान्स करणार आहे, अशी चर्चा आहे. 

sonam - anand

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonam Kapoor and Anand Ahuja are going to get married