सोनम कपूरच्या डोहाळ जेवणाचे खास फोटो, बहिण रियाची खास पोस्ट...

sonam kapoor
sonam kapooresakal

सोनम आई होणार हे कळताच अहुजा आणि कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होता.सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी सोनमला शुभेच्छा देत त्यांचा आनंद व्यक्त केलाय. ऑगस्ट महिन्यात बाळाची अपेक्षा असणारी सोनम आणि तिचा पती आनंद फार आनंदी आहे. नुकताच तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे फोटोज सोनमच्या बहिणीने सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

sonam kapoor
सोनम कपूरला मुलगा होणार की मुलगी?; अनिल कपूर यांनी बोलता-बोलता सांगून टाकलं

बेबी शॉवरच्या या खास प्रसंगी सोनम कपूर गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसली, ज्यामध्ये तिचा लूक पाहण्यासारखा होता. तिच्या अनेक फोटोंमध्ये अभिनेत्री बेबी बंप करताना दिसली.

बहिण रिया कपूरने या बेबी शॉवर सोहळ्यातील प्रत्येक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रियाने एक नोट देखील शेअर केली आहे ज्यामध्ये पाहुण्यांच्या नावांसह प्रत्येक तपशील शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत रिया कपूरने लिहिले, 'किती सुंदर बेबी शॉवर...'

सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले होते. प्रत्येक पाहुण्यांसाठी त्यानुसार मेनू तयार करण्यात आला होता. इतकंच नाही तर बेबी शॉवरची सजावटही अतिशय राजेशाही पद्धतीने करण्यात आली होती.

sonam kapoor
सोनम कपूर लवकरच होणार आई! Baby Bump दाखवत शेअर केला फोटो

बेबी शॉवरचे निमंत्रण कलाकार लिओ कल्याणला देखील देण्यात आले होते. यावेळी कल्याणने आपला परफॉर्मंस सादर केला.

लिओ कल्याणनेही सोनम कपूरसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय त्याने लाइव्ह परफॉर्मन्सचा व्हिडिओही शेअर केला आहे. यावेळी त्याने, 'बॉलिवुडमधील स्पाइस गर्ल असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. दोघांच्या लग्नाला कुटुंबातील आणि बॉलिवूडमधील अनेक खास स्टार्सनीही हजेरी लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com