#JNUAttack : 'लिडर हवा तर असा' सोनमने केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

वृत्तसंस्था
Monday, 6 January 2020

काल दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या बेदम मारहाणीविरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटतायत. राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य़ ठाकरे यांनी याविषयीचं एक ट्विट केलं आहे. त्याला विशेष पसंती दिली आहे ती बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने. जाणून घ्या सोनमचं आणि आंदोलनाचं कनेक्शन आहे कस? 

मुंबई : काल दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या बेदम मारहाणीविरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटतायत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. विद्यार्थ्यांनी देशभरातून विविध शहरात आंदोलने केली. घडलेल्या प्रकरावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य़ ठाकरे यांनी याविषयीचं एक ट्विट केलं आहे. मात्र त्याला विशेष पसंती दिली आहे ती बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने. 

जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं. त्यामध्ये लिहिलं आहे,' निषेध करीत असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू, विद्यार्थ्यांना अशाप्रकारचा हल्ला नाही झाला पाहिजे. बळाचा वापर केलेल्या गुंडांवर लवकरच कारवाई झाली पाहिजे.' 

अशाप्रकराचं व्टिव आदित्य यांनी केलं. आदित्य यांच्या ट्विटला अभिनेत्री सोनम कपूरने प्रतिसाद दिला आणि त्यांचं कौतुकही केलं आहे. सोनमने ट्विट करताना लिहिलं, 'आपल्याला अशाप्रकारच्या नेत्यांची गरज आहे. अपेक्षा कायम आहेत.'सोनमने दिलेल्या प्रतिक्रेयेवर नेटकरीही रिप्लाय करत आहेत. सध्या तिचं हे ट्विट इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतय.

जेएनयू म्हणजेच जवाहरलाल नेहरु विद्यालयातील विद्यार्थ्यांवर सायंकाळी हल्ला करण्यात आला. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष जखमी झाल्या. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, 'विद्यापीठाच्या आवारामध्ये काही अनोळखी लोक जमा झाले असल्याची पूर्वकल्पना आम्ही पोलिसांना दिली होती. पण, त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. विद्यापीठ शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात आम्ही शांततेत आंदोलन करीत होतो. पण, त्यामध्ये व्यत्यय आणण्यात आला.'

Image may contain: 10 people, people standing and outdoor

सोनमचं JNU कनेक्शन
सोनमने अनेक चित्रपट केले आणि त्यातील काही सुपरहिट ठरले. नेहमीच लक्षात राहणारा तिचा चित्रपट म्हणजे 'रांझणा'. दाक्षिणात्या स्टार धनुष, अभय देओल यांच्यासोबत सोनम मुख्य भूमिकेत झळकली. त्यामध्ये सोनम 'झोया' ही व्यक्तीरेखा साकारते आणि चित्रपटात अभय देओल म्हणजेच अक्रमसोबत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेते. खऱ्या आयुष्यात नाही पण, चित्रपटात कुठेतरी सोनमने आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामधला तिचा डायलॉग महत्त्वपूर्ण आहे. चित्रपटात सोनम म्हणते, ''दो टाइप के लिडर होते है...एक वो जो सरकार गिराकर खूष होते है, दुसरे वों जो सरकार बनाकर खूष हो जाते है ''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonam kapoor replied on aditya thackerays JNU attack tweet