सोनम कपूरच्या मालदीव वेकेशनचा 'हा' व्हिडीओ तुम्ही पहाच !

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

सोनम कपूर तिचा पती आनंद अहुजा आणि बहिण रिया कपूर यांच्यासोबत मालदीवमध्ये वेकेशन एन्जोय करताना दिसली. पहा व्हिडीओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. फॅशन सेंसेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमचे आणि तिच्या फॅशन स्टाइलचे चाहते आहेत. सोनम तिचा पती आनंद अहुजा आणि बहिण रिया कपूर यांच्यासोबत मालदीवमध्ये वेकेशन एन्जोय करताना दिसली. रियाचा बॉयफ्रेंड करण बुलानीही या ट्रिपमध्ये सामील होता. त्याचे काही खास फोटो आणि व्हिडीओ सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

'मॅजिकल मालदीव' असं व्हिडीओ कॅप्शन देत सोनमने संपूर्ण ट्रिपचा एका प्रकारचा व्लॉग शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर एकुण 22.2 मिलियन फोलोअरस् आहेत. तिने शेअर केलेल्या व्हिडीओला दोन लाख लाईक्स मिळाले आहेत. दोन मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये सोनम, पती आनंद, रिया कपूर आणि इतर मित्र दिसत आहेत. मालदिव ट्रिपचे मजेशीर व्हिडीओ, क्षण आणि फोटो सोनमने यामध्ये दाखविले आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं की सोनमने या वेकेशनचा पुरेपुर आनंद लुटला आहे.  Image may contain: 2 people, swimming and outdoor

आनंद अहुजानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही मजेशीर व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. सोनम आणि आनंद यांचे एकत्र फोटो कपल गोल्स असल्याचं चाहत्याचं म्हणणं आहे. तर सोनमही बिकीनीमध्ये 'हॉट' दिसतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@sonamkapoor and I on the slide  vs. Me alone on the slide @discoversoneva #SonevaFushi #DiscoverSoneva

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on

सोनमचा 'दि झोया फॅक्टर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्यामध्ये ती दलकर सलमान आणि अंगद बेदी यांच्यासोबत झळकली. सोनमने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी अद्याप कोणतीच माहिची दिलेली नाही. सोनम आणि आनंद यांनी बरेच वर्ष डेट केल्यावर 2018 च्या मे महिन्यात लग्न केलं. 

Image may contain: 1 person, standing, ocean, sky, outdoor, water and nature


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonam Kapoor shared a video of her Maldives trip must watch