सोनमचे दागिने 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

अभिनेत्री सोनम कपूर पहिल्यांदाच कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालीय. पण तिची रेड कार्पेटवरील आत्मविश्‍वासाने भारलेली अदाकारी पाहता वाटलंच नाही की, ती पहिल्यांदा आलीय.

अभिनेत्री सोनम कपूर पहिल्यांदाच कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालीय. पण तिची रेड कार्पेटवरील आत्मविश्‍वासाने भारलेली अदाकारी पाहता वाटलंच नाही की, ती पहिल्यांदा आलीय.

इतका तिचा रेड कार्पेटवरील वावर सुखावणारा होता. सोनमने या वेळी इले साबने डिझाईन केलेला कस्टम मेड हॉन्ट कॉच्युर ड्रेस परिधान केला होता आणि तिच्या लूकला साजेसे दागिने तिने घातले होते. या दागिन्यांनीच तिचा लूक अधिक खुलला होता. त्यामुळे तिच्या दागिन्यांची चर्चाही या वेळी रंगली होती. कल्याण ज्वेलर्स यांचे कस्टम मेड दागिने त्यात खास करून कानातले आणि हातफूल विशेष होते. त्याला कारणही तसंच होतं. हे दागिने सोनमची बहीण रिहा कपूर हिने डिझाईन केले होते. म्हणूनच ते खास होते. कारण आपल्या लाडक्‍या बहिणीने आपल्यासाठी एखादी गोष्ट केली तर ती खासच असते ना...  

Web Title: sonam kapoors ornaments