गाणं, डान्स अन्‌ आता स्पोर्टस्‌ 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

अभिनेत्री श्रद्धा कपूर "लव्ह का द एण्ड' चित्रपटात पहिल्यांदा दिसली. अर्थात, तो चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर आलेला तिचा "आशिकी 2' जबरदस्त हिट झाला. श्रद्धा रातोरात स्टार झाली. तिला एकेक सिनेमे मिळू लागले अन्‌ तिचं टॅलेंट नव्यानं पुढे येऊ लागलं. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय व गाण्यानं सर्वांना आपलंसं करणाऱ्या श्रद्धाचा नवनवीन गोष्टी करण्याकडे कल असतो. "एबीसीडी 2'मध्ये तिनं आपले डान्सचे जलवे दाखवले. आता दिग्दर्शक मोहित सुरीच्या "हाफ गर्लफ्रेंड'मध्ये ती हटके लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या "हाफ गर्लफ्रेंड' पुस्तकावर आधारित असलेल्या चित्रपटात ती बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर "लव्ह का द एण्ड' चित्रपटात पहिल्यांदा दिसली. अर्थात, तो चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर आलेला तिचा "आशिकी 2' जबरदस्त हिट झाला. श्रद्धा रातोरात स्टार झाली. तिला एकेक सिनेमे मिळू लागले अन्‌ तिचं टॅलेंट नव्यानं पुढे येऊ लागलं. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय व गाण्यानं सर्वांना आपलंसं करणाऱ्या श्रद्धाचा नवनवीन गोष्टी करण्याकडे कल असतो. "एबीसीडी 2'मध्ये तिनं आपले डान्सचे जलवे दाखवले. आता दिग्दर्शक मोहित सुरीच्या "हाफ गर्लफ्रेंड'मध्ये ती हटके लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या "हाफ गर्लफ्रेंड' पुस्तकावर आधारित असलेल्या चित्रपटात ती बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची निर्मिती चेतन भगत, एकता कपूर व मोहित सुरी यांनी केली आहे. 19 मे रोजी तो पडद्यावर झळकेल. "हाफ गर्लफ्रेंड'साठी श्रद्धाची निवड झाली, तेव्हा सुरुवातीला ती भूमिकेसाठी योग्य नसल्याचं बोललं जात होतं. चित्रपटात श्रद्धा व अर्जुन कपूर बास्केटबॉलपटूच्या भूमिकांमध्ये आहेत; पण फार कमी दिवसांत श्रद्धा बास्केटबॉलमध्ये तरबेज झाली. तिनं भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलीय. सिनेमात दिल्लीतील महाविद्यालयात शिकणारी मुलगी असल्यामुळे ती जास्त स्टायलिश अन्‌ फॅशनेबल दिसणार आहे. गाणं अन्‌ नृत्यानंतर श्रद्धा आता स्पोर्टस्‌मध्ये नशीब आजमावणार आहे. 
 

Web Title: song, Dance and sports now