दोन हजाराची नोट नाचवणार  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

काही महिन्यांपूर्वीच चलनात आलेल्या दोन हजाराच्या नोटेने चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. हीच उत्सुकता आता मराठी सिनेसृष्टीलाही असणार आहे. कारण हीच नोट आता प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे.

मुंबई : काही महिन्यांपूर्वीच चलनात आलेल्या दोन हजाराच्या नोटेने चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. हीच उत्सुकता आता मराठी सिनेसृष्टीलाही असणार आहे. कारण हीच नोट आता प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे. प्रेमा या आगामी मराठी चित्रपट या नोटेला घेऊन एक आयटम सॉंग रचण्यात आले आहे. नृत्यतारका मानसी नाईक हिच्या मोहक अदा सिनेरसिकांना या गाण्यात पाहायला मिळणार आहेत. 

रमेश गुर्रम निर्मित आणि सदानंद इप्पकायल दिग्दर्शित प्रेमा या आगामी चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहीली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि रेश्‍मा सोनावणे यांनी गाणी गायली आहेत. तर याचे नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै यांनी केले आहे. 

Web Title: song don hajarachi not