‘वैष्णो देवी’ मालिकेसाठी सोनू निगम आणि नेहा कक्कर गाणार!

neha and sonu nigam.
neha and sonu nigam.

स्टार भारत वाहिनीवरील ‘वैष्णो देवी’ मालिकेसाठी सोनू निगम आणि नेहा कक्कर हे एक ‘जाग्रता’ गीत गाणार आहेत. अलीकडेच सुरू झालेल्या ‘जग जाननी माँ वैष्णो देवी- कहानी माता रानी की’ या मालिकेत माता वैष्णोदेवीची अनेक गुपिते उघड झाली आहेत.

मातेचा जन्म कसा झाला? मातेच्या पृथ्वीवरील अवताराचे कारण काय? तिला पापनाशिनी का म्हणतात? प्रेक्षकांना आता जाग्रता म्हणजे काय आणि ते कसे साजरे करतात, त्याची माहिती कळेल. 

नामवंत पार्श्वगायक सोनू निगम आणि गायिका नेहा कक्कर या मालिकेसाठी एक जाग्रता गीत गाणार आहेत. 
या भागात रक्तपित्यांपासून गावकऱयांचे रक्षण करण्यासाठी वैष्णोदेवीच्या नऊ अवतारांची महती आणि एक जाग्रता गीत असणार आहे. 

सोनू निगमने केवळ बॉलीवूडच्या चित्रपटांमध्येच पार्श्वगायन केले आहे, असे नव्हे, तर त्याने अनेक भाषांमधून गीते गायली आहेत.  तर नेहा कक्करनेही बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये तसेच अल्बममध्ये अनेक गीते गायली आहेत. सोनू निगम व नेहा कक्करच्या आवाजामुळे जाग्रता गीतांना नवी ऊर्जा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com