Sonu Nigam: काय झालं होतं? शोमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सोनू निगमने सोडली मुंबई म्हणाला... व्हिडीओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Nigam

Sonu Nigam: काय झालं होतं? शोमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सोनू निगमने सोडली मुंबई म्हणाला... व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यावर मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झाला. त्यानंतर बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली. सोशल मीडियावर त्या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. या बातमीने सिंगरचे चाहते आश्चर्यचकित झाले होते आणि त्याच्याबद्दल विचारत होते.

आता या हल्ल्यानंतर सोनू निगम पुन्हा आपल्या कामाकडे वळला आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सोनू निगम विमानतळाकडे जाताना दिसत आहे.

सोनू निगम कामानिमित्त शहराबाहेर जात असताना पापाराझींनी त्याला कॅप्चर केले. यादरम्यान सोनू निगमचा मूड एकदम शांत होता. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो आता कसा आहे, तेव्हा सोनू निगमने थम्स अप केले आणि सांगितले की तो आता ठीक आहे. इशारा करत सोनू निगम म्हणाला 'ऑल ओके...'

काल रात्री मुंबईत एका म्यूजिक कॉन्सर्ट दरम्यान गायक सोनू निगमसोबत धक्का-बुक्की झाली. यादरम्यान सिंगरची टीमही जखमी झाली. सोनूचे गुरू गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा आणि त्याचा जवळचा मित्र रब्बानी खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

सोनूला जी धक्काबुक्की करण्यात आली ती उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे आमदार यांच्या मुलानं केली. असा आरोप पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्याच्याविरोधात सोनूनं पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हे सगळं प्रकरण सेल्फीमुळे घडल्याची चर्चा आहे.