
Sonu Sood Video : 'तूच आमचा देव', लोकांनी चक्क सोनु सुदचं बांधलं मंदिर!
Sonu Sood Viral Video : बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्याच्या दातृत्वाची नेहमीच चर्चा होते त्या सोनु सुदनं चाहत्यांसाठी, लोकांसाठी खूप काही केले आहे. कोरोनाच्या काळात तर तो देवदूत होऊन लोकांच्या मदतीला धावून जात होता. देशभरामध्ये सोनुच्या नावाचा जयघोष सुरु होता. जिथे सरकारी मदत पोहचत नव्हती तिथं सोनु सुदचे सामाजिक कार्य पोहचत होते. त्याच्या वेगवेगळ्या संस्थांनी लोकांची भरभरून सेवा केल्याचे दिसून आले.
आता सोनु सुद हा एका वेगळया कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या नावात चक्क मंदिर उभारल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे त्यावर सोनुलाही काय बोलावं असा प्रश्न पडला आहे. यापूर्वी देखील त्याच्या नावानं मंदिर उभारल्याचे दिसून आले आहे. पुन्हा एक मंदिर उभारले गेल्यानं सोनुला यावर काय बोलावं हे कळेनासे झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून सोनु सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.
Also Read - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सोनु सुदनं केलेल्या सामाजिक कामांवर आधारित मसिहा नावाचे पुस्तकही बाजारपेठेत आले आहे. ते लोकप्रियही झाले आहे. आता त्याच्या नावानं मंदिर झाल्यानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सोनुनं व्हायरल झालेला तो व्हिडिओ पाहताच म्हटले आहे की, अरे माझ्या पाया पडू नका. मला पुजू नका. मी तुमच्यातलाच आहे. तेव्हा कृपया करुन माझी मंदिरं बांधू नका. असेही सोनुनं म्हटले आहे.
बॉलीवूड अभिनेता सोनुच्या परोपकारी स्वभावाचा अनेकांना प्रत्यय आला आहे.कोरोनाच्या काळात सोनुनं जेव्हा लोकांना मदतीची गरज होती तेव्हा प्रचंड सहकार्य केल्याचे दिसून आले. त्यानं गरीब मुलींचे शिक्षण, त्याचा खर्च याबाबतही पुढाकार घेतला होता. दक्षिण भारत, उत्तर भारत यामध्ये सोनुनं लाखो लोकांना मदतीचा हात दिल्यानं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, भारताचा खरा हिरो, सोनु सुद. आयएनएसनं सोनु सुदच्या सन्मानार्थ जे मंदिर बांधले जात आहे त्याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे सोनुच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.