शाळेत जाण्यासाठी जंगलातून जावं लागायचं, सोनूनं सायकल दिली 

sonu sood helps to school student for education
sonu sood helps to school student for education

मुंबई - समाजात गरजूंना मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सुदचे नाव घेतले जाते. त्याने मोठ्या प्रमाणावर केलेल्या सहकार्यामुळे त्याचा फॉलोअर्स लाखोच्या घरात आहे. आताही त्याने जंगलातून शाळेत जाव्या लागणा-या मुलींसाठी सायकल देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

संतोष चौहान नावाच्या एका व्यक्तीने सोनूचे लक्ष वेधले. त्याने त्याला उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील सदयस्थितीची माहिती दिली. ज्यांना 5 वीनंतर परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले त्याचे मुख्य कारण म्हणजे मुलींना पुढे शिक्षण घेण्यासाठी पायी 8-15 किमी, जंगलाचा रस्ता पार करावा लागणे हे होते. ट्विट पाहिल्यानंतर सोनूने आश्वासन दिले की, तो गावातील प्रत्येक मुलीपर्यंत सायकल आपण देणार.

शनिवारी सकाळी पीटर फर्नांडीज नावाच्या ट्विटर यूजने एका मुलीचा फोटो शेअर करत सोनू सूदला सांगितले होते की, त्यांच्या मदतीने मुलगी एकदम बरी झाली. उत्तरात सोनूने लिहिले होते की, मुलीच्या स्माइलने माझ्या दिवसाची सुरुवात चांगली केली. मुंबईतील या 10 वर्षाच्या मुलीच्या पाठीच्या कण्यामध्ये क्रॅक होता आणि ती गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिच्यावर उपचार होऊ शकत नव्हते. सोनूला याची माहिती मिळताच त्याने आर्थिक मदत केली. 28 ऑक्टोबर रोजी मुलीची शस्त्रक्रिया झाली होती.

एका ट्विटर युजरने सोनू सूदला भाऊ म्हणून संबोधत त्यांच्याकडून फटाक्यांची मागणी केली होती. त्याला उत्तर म्हणून अभिनेत्याने लिहिले की, 'यावेळी दिवाळीत सर्व फटाके जाळू नका तर कोणाची तरी चूल पेटवा.'
 
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com