Sonu Sood: फक्त सोनु सूदचीच हवा! देशातील सर्वात मोठी फूड प्लेट त्याच्यानावानं... फोटो व्हायरल

नुकतेच सोनूचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या फूड प्लेटला सोनू सूदचे नाव देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
sonu sood
sonu sood Sakal

बॉलीवूडमधील सर्वात ताकदवान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सोनू सूदला वेगळ्या ओळखीची गरज नाही. चित्रपटांसोबतच सोनू सूदने आपल्या औदार्याने चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे सोनू सूदचे नाव नेहमीच चर्चेत असते.

नुकतेच सोनूचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या फूड प्लेटला सोनू सूदचे नाव देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोनूचे नाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.

कोरोना महामारीपासून आतापर्यंत गरजूंना मदत केल्यामुळे सोनू देखील दररोज प्रसिद्धीचा एक भाग बनतो. ज्यासाठी अनेकवेळा सोनू सूदला वेगवेगळ्या प्रकारे सन्मानित केले जाते. दरम्यान, सोनू सूदच्या नावावर एका मोठ्या जेवणाच्या थाळीचे नाव देऊन अभिनेत्याचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. ज्याची माहिती सोनू सूदने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

sonu sood
Amitabh Bachchan : मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी, अमिताभ यांच्या जांभईच्या फोटोला मिळतात लाखो व्ह्युज!

या फोटोंमध्ये सोनू सूद बिर्याणीने भरलेल्या मोठ्या थाळीजवळ उभा राहून पोज देताना दिसत आहे. सोनू सूदने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "भारतातील सर्वात मोठ्या फूड प्लेटचे नाव आता माझ्या नावावर ठेवण्यात आले आहे. एक शाकाहारी व्यक्ती म्हणून जे कमी खाणं पसंत करतात त्यांच्यासाठी ही एक खास थाळी असून एकेकाळी २० जण एकत्र बसून पोटभर जेवू शकतात इतकी मोठी ही थाळी असल्याचंही सोनुने म्हटलं आहे".

सोनू सूदच्या नावावर भारतातील सर्वात मोठ्या फूड प्लेटचा मान जिस्मत गेलमंडीने दिला आहे. सोनू सूदनेही या फोटोंसोबत त्याची माहिती शेअर केली आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या पद्धतीने लोकांना मदत केली, त्यामुळे सोनू सूदचे नाव वेगळ्या ओळखीकडे वाटचाल करू लागले आहे. अनेक लोक सोनू सूदला रिअल हिरो या नावानेही हाक मारतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com