बाकी कुणी नाही पण सोनू मदतीला आला धावून!|Odisha Train Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood

Odisha Train Accident : बाकी कुणी नाही पण सोनू मदतीला आला धावून!

Sonu Sood Odisha train tragedy victims social media viral tweet : बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मदतीशील अभिनेता कोणता, संकटकाळी कोणता सेलिब्रेटी सर्वाधिक सक्रिय होतो यामध्ये कुणीही बिनदिक्कतपणे प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदचे नाव घेता येईल. कोरोनाच्या काळात सोनू सूदनं मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. यात त्यानं लाखो लोकं आपल्या कामामुळे जोडली होती.

आता सोनू सूदनं पुन्हा एकदा त्याच्या दातृत्वाचा परिचय करुन दिला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये रेल्वेचा जो अपघात झाला त्यामुळे पूर्ण देश हादरुन गेला होता. त्या घटनेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. २५० हून अधिक प्रवाशांना त्या अपघातात प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर त्या अपघातातील प्रवाशांच्या मदतीसाठी शेकडो संघटना पुढे आल्या आहेत. त्यात सोनूच्या सामाजिक संघटनेनं देखील महत्वाची भूमिका बजावली आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

बाकी कुणी नाही पण सोनू सूदच्या मदतीमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला धन्यवाद दिले आहे. यापूर्वी देखील सोनूच्या मदतशील पणाचा अनुभव लोकांनी घेतला आहे. काश्मीर पासून केरळपर्यत अनेक राज्यांतील लोकांच्या मदतीला सोनू धावून गेला होता. यासगळ्यात आता त्यानं ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणात त्यानं एक हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. सोशल मीडियावर याबाबत सोनूनं एक पोस्ट देखील शेयर केली आहे.

कोरोनाच्या काळात सोनूनं अनेक कुटूंबियांना खूप मोलाची मदत केली होती. त्यानंतर त्याच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील त्या घटनेनं अनेकांना मोठा धक्का दिला आहे. ज्या लोकांना मदतीची गरज होती त्यांना सूदनं मदतीचा हात दिला आहे.

सोनूनं आता सोशल मीडियावर एक हेल्पलाईन नंबर व्हायरल केला आहे. ज्यामध्ये त्यानं इतर लोकांना देखील मदतीचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त लोकांनी ओडिशाच्या घटनेतील लोकांसाठी मदतीसाठी पुढे यावे. असे सोनूनं म्हटले आहे. त्याच्या त्या ट्विटला नेटकऱ्यांनी प्रतिसादही दिला आहे.