Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूदचं तगडं प्लॅनिंग.. केलं खास आवाहन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Sood urges people to support victims of the Balasore tragedy Odisha Train Accident

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूदचं तगडं प्लॅनिंग.. केलं खास आवाहन!

ओडिशा रेल्वे अपघाताच्या बातमीने शनिवारची सकाळ संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरली आहे. या हल्ल्यात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 900 हून अधिक जण जखमी झाले.

भारतीय चित्रपट इंडस्ट्री , कलाकार सगळेच सोशल मीडिया वरून त्यांचं दुःख व्यक्त करत असून पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देत आहेत. या सगळ्या प्रकारात अभिनेता सोनू सूदने पीडितांच्या कुटुंबासाठी काहीतरी अनोखी करण्याचे धाडस दाखवले आहे.

अभिनयाच्या सोबतीने गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारा अभिनेता सोनू सूद ओळखला जातो. या अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि तसेच त्याने एक खास योजना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारला सुचवली आहे.

(Sonu Sood urges people to support victims of the Balasore tragedy Odisha Train Accident)

या व्हिडिओ मध्ये सोनूने सांगितले आहे की, 'ओडीशा मध्ये एवढी भीषण घटना घडूनही आपल्याकडचं राजकारण थांबलेलं नाही. प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. पण हे अत्यंत दुर्दैवी आहे.'

'अशा वेळी राजकारण मागे सारून सर्वांनी पुढे यायला हवं. केवळ नेतेच नाही तर सर्वसामान्य माणसांनीही मदतीसाठी पुढे यायला हवं, सोशल मिडीयावर शोक व्यक्त करणं खूप सोपं आहे, जे सगळेच करत आहेत. पण त्या पलीकडे जाऊन तुम्हाला शक्य होईल तशी प्रत्यक्ष मदत करा.'

पुढे सोनू सूद एक योजनाही सरकारला सुचवली. 'सरकार चांगलं काम करत आहे. ते पीडितांना भरपाई देत आहेत. परंतु अशा पीडितांचे आयुष्य दीर्घ काळासाठी सुरक्षित राहण्यासाठी काहीतरी ठोस उपाय करायला हवा. जेणेकरून त्यांना महिन्याला ठराविक उत्पन्न मिळू शकेल.'

'त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, अशा दुःखद अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही निश्चित उत्पन्न धोरण तयार करण्यात यावं.'

सोनू म्हणतो की, 'सरकारकडून नियमित आर्थिक मदत मिळाल्याने ज्या लोकांनी आपली जवळची लोकं गमावली आहेत त्यांना दीर्घकाळ त्रास होणार नाही याची खात्री घेतली जाईल. किमान यांचे उपजीविकेचे प्रश्न मार्गी लागतील,' असे सोनू म्हणाला आहे.

टॅग्स :Bollywood Newssonu sood