'या' मालिकेतून उलगडणार संत कान्होपात्राचे चरित्र.. वारी विशेष भाग.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sony marathi dnyaneshwar mauli serial wari special episod sant kanhopatra

'या' मालिकेतून उलगडणार संत कान्होपात्राचे चरित्र.. वारी विशेष भाग..

dnyaneshwar mauli : सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सगळं प्रेक्षकांना आवडलं. अलौकिक हरिभक्तीच्या ह्या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. माउली, त्यांची भावंडं, इतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळणार आहे. (sony marathi dnyaneshwar mauli serial wari special episod sant kanhopatra)

या संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने होणार आहे. माउलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करेल. संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार आहे. छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारून तितिक्षाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तितिक्षा नव्या वेषात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साधी साडी, हातात वीणा आणि चिपळ्या अशा मोहक रूपात तितिक्षा असेल. तिची ही पहिलीच आध्यात्मिक भूमिका असल्याने तिने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कान्होपात्रा ही गणिका होती पण तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग त्यांच्यावर प्रसन्न झाला. या विशेष भागात विठ्ठलाची निस्सीम भक्त असलेली कान्होपात्रा आणि ज्ञानेश्वर माउली यांची जेव्हा भेट होईल, तेव्हा कोणते चमत्कार बघायला मिळतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Sony Marathi Dnyaneshwar Mauli Serial Wari Special Episod Sant Kanhopatra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..